LPG Gas Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले? सोशल मीडियावरील अफवांवर सरकारचं स्पष्टीकरण

25 Mar 2026 13:54:23

LPG Gas Booking Rule



मुंबई : (LPG Gas Booking Rules)
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजी (LPG) तुटवडा निर्माण झाल्याच्या आणि बुकिंगचे नियम बदलल्याच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर केंद्र सरकारने आता परिपत्रक जारी करत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एलपीजी बुकिंगच्या कालमर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच देशात LPG चा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.(LPG Gas Booking Rules) 

काय होत्या अफवा?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असा दावा केला जात होता की, पेट्रोलियम कंपन्यांवरील दबावामुळे उज्ज्वला योजने (PMUY) च्या लाभार्थ्यांसाठी सिलेंडर बुकिंगसाठी ४५ दिवस, तर इतर ग्राहकांसाठी २५ ते ३५ दिवसांचे अंतर अनिवार्य करण्यात आले आहे. या अफवांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, "असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि जुनेच नियम लागू राहतील."(LPG Gas Booking Rules)


सध्याचे अधिकृत नियम काय आहेत?


शहरी भाग : २५ दिवस.
ग्रामीण भाग : ४५ दिवस.


हे नियम सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी (PMUY किंवा Non-PMUY) सारखेच आहेत.


सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा निराधार अफवांवर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू नये. अनावश्यक बुकिंग करून गोंधळ निर्माण करू नये आणि कोणतीही अप्रमाणित किंवा चुकीची माहिती पुढे पाठवण्याचे टाळावे. जबाबदार नागरिक म्हणून तथ्य पडताळूनच माहितीची देवाणघेवाण करणे गरजेचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.(LPG Gas Booking Rules)







Powered By Sangraha 9.0