Supreme Court SC Status Decision: धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

24 Mar 2026 16:24:36

Supreme Court SC Status Decision

मुंबई : (Supreme Court SC Status Decision)
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (SC/ST) आरक्षणासंदर्भात मंगळवारी २४ एप्रिल रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. "हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती (SC) दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही. धर्मांतर केलेली व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाही", असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Supreme Court SC Status Decision)

हिंदू, शीख व बौद्ध वगळता अन्य धर्मांतरितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही

न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय राज्यघटनेच्या (अनुसूचित जाती) आदेश, १९५० नुसार, केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जातीचे सदस्य मानले जाऊ शकते. एखादी व्यक्ती शीख, बौद्ध किंवा इतर भारतीय मूळ धर्म सोडून बाह्य धर्म स्वीकारत असल्यास, त्या व्यक्तीला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत मिळणाऱ्या सुविधा आणि संरक्षणांचा लाभ मिळणार नाही. केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जाती (SC) दर्जाचा दावा करण्याचा अधिकार आहे.  (Supreme Court SC Status Decision)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चिंथडा आनंद नावाच्या एका पाद्रीने याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. आनंद यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मे २०२५ च्या निकालाला आव्हान दिले होते. जातीय भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप आनंद यांनी याचिकेत केला होता.आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत मिळणाऱ्या लाभांवर दावा करता येणार नाही. या निर्णयामुळे आरक्षण आणि धर्मांतर या विषयांवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. (Supreme Court SC Status Decision)


Powered By Sangraha 9.0