मुंबईच्या प्रभादेवीत आढळली पिठ्या ढेकूणाची नवी प्रजात

24 Mar 2026 17:14:00
 
new species of mealybug
 
 
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील प्रभादेवी येथून मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकूणाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of mealybug). महत्त्वाचे नव्याने शोधलेल्या या प्रजातीचे कुळ हे भारतात प्रथमच आढळले असून प्रजातीचे नामकरण स्पिलोकोकस गुलानी, असे करण्यात आले आहे (new species of mealybug). ही प्रजात प्रभादेवीच्या राहत्या घरातील सक्यूलेंट झाडावर आढळून आली आहे (new species of mealybug). पिठ्या ढेकूण हा शेती आणि बागेतील रोपांवर आढळणारा एक पांढऱ्या रंगाचा कापसासारखा दिसणारा कीटक आहे (new species of mealybug). जो पिकांचा रस शोषून झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. (new species of mealybug)
 
 
मिलीबगला मराठीत मावा किडा किंवा 'पिठ्या ढेकूण' असे म्हणतात. या कीटकांच्या शरीरावर पांढऱ्या पिठासारखा किंवा कापसासारखा थर असतो. हे किटक झाडांची कोवळी पाने, फांद्या, कळ्या आणि मुळांमधील रस शोषतात. ज्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि झाड सुकते. या मावा किड्याच्या दोन नव्या प्रजातींचा शोध मुंबई आणि केरळमधून लावण्यात आला आहे. यामधील मुंबईच्या प्रजातीवर संशोधन करण्याचे काम डाॅ, सुनिल जोशी, परेश चुरी आणि अमित अमेम्बल यांनी केले आहे. तर केरळमध्ये आढळलेल्या चोरिझोकोकस वॉटसन या प्रजातीचे संशोधन डाॅ. जोशी यांच्यासमवेत, सचिन पै आणि के.बी.दिपथी यांनी केले आहे. यांसंबंधीचा शोधनिंबध 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. मुंबईतून नव्याने शोधलेल्या प्रजातीचे स्पिलोकोकस हे कुळ भारतात प्रथमच आढळले आहे. जगभरात मावा किड्याच्या १,३६२ प्रजाती आढळत असून भारतात त्यापैकी १३८ प्रजाती सापडतात. तर स्पिलोकोकस या कुळात ३२ प्रजातींचा समावेश होतो.
 
 
प्रभादेवी येथील स्थानिक अमित अमेम्बल यांच्याकडे निवडुंगाची बाग आहे. २०२० साली त्यांना या बागेतील अेडीथकोलिआ ग्रॅडीस या सक्यूलेंट झाडावर काही पिठ्या ढेकूण दिसले. ते या झाडाचा रस शोषून घेत असल्याने त्याची वाढ खुंटत होती. अमेम्बल यांनी याची माहिती किटक अभ्यासक परेश चुरी यांना दिली. चुरी यांनी निवडुंगावरील पिठ्या ढेकूणांची पाहणी केली. त्यांना या पिठ्या ढेकूणांमध्ये वेगळेपण जाणवले. या किड्यावरील लाल ठिपके त्यांनी यापूर्वी कोणत्याही माव्या किड्याच्या शरीरावर पाहिले नव्हते. त्यामुळे या किड्यांमध्ये नाविन्य वाटल्याने त्यांनी या प्रजातीचे काही नमुने हे राष्ट्रीय कृषी किटक संसाधन ब्यूरोचे शास्त्रज्ञ डाॅ. सुनिल जोशी यांना पाठवले. जोशी यांना तपसाणी केल्यावर ही प्रजात नवीन असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
 
 
फेब्रुवारी, २०२० मध्ये आम्हाला या प्रजातीचे १५ ते १६ किटक सक्यूलेंट झाडावर आढळून आले. पुढील दोन महिने आम्ही त्यांचे सखोल निरीक्षण केले. यादरम्यान ज्या सक्यूलेंट झाडावर ते अन्नग्रहण करत होते, ते मरुन गेले. त्यानंतर आजतागायत ही प्रजात आम्हाला सापडलेली नाही. ही प्रजात साधारण १ सेंमी वाढते. - परेश चुरी, संशोधक
 
पिठ्या ढेकूण हे वनस्पतींकरिता हानिकारक किटक आहेत. त्याची कोणतीही प्रजात उपयोग नाही. या किटकांना दात नसतात. त्याऐवजी त्याला एक स्ट्राॅ सारखा अवयव विकसित झालेले असतो. हा स्ट्राॅ सारखा अवयव तो वनस्पतीमध्ये घुसवतो आणि त्यामधला रस शोषून घेण्यास सुरुवात करतो. एखादा का स्ट्राॅसारखा अवयव वनस्पतीमध्ये घुसला गेला की तो आयुष्यभरासाठी बाहेर येत नाही. हे किटक एकापेक्षा अधिक झाडांवर अन्नग्रहण करु शकतात - डाॅ. सुनिल जोशी, संशोधक
Powered By Sangraha 9.0