मीडिया क्षेत्रातील विद्यार्थी व नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी
24-Mar-2026
Total Views |
मुंबई (Mumbai Tarun Bharat Job Vacancy) : माध्यम क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दै.मुंबई तरुण भारतर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, दै.'मुंबई तरुण भारत' आणि Maha MTB या संस्थेत विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वडाळा, दादर येथील कार्यालयासाठी मुलाखत आणि लेखी परीक्षेअंती ही निवड केली जाणार आहे.
दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पुढील पदांसाठी नोकरीची संधी
1. उपसंपादक (दैनिकासाठी) - मुंबई
दै. मुंबई तरुण भारतच्या मुख्य आवृत्तीसाठी वृत्तपत्रात (न्यूज डेस्क) संपादकीय कामकाजाचा किमान २ ते ३ वर्षांचा पूर्णवेळ अनुभव असलेले उपसंपादक पाहिजेत.
पात्रता
• पत्रकारितेचे (पदवी/पदविका शिक्षण)
• वृत्तपत्रीय वाचन व लिहिण्याची आवड
• मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
• बातम्यांची उत्तम जाण व वृत्तसंपादनाचे कौशल्य
• संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक
• वेब माध्यमांवर अभिव्यक्त होण्याची सवय
• त्वरीत न्यूज ब्रेक करण्याच्या उमेदवारांना प्राधान्य
🕒 कामकाजाची वेळ – दुपारी 2.30 ते रात्री 10.30
📍 कामाचे ठिकाण – मुंबई
आपला CV आणि सोबत प्रकाशित बातम्या/लेख/लिंक्स ईमेल करा:[email protected]
2. उपसंपादक - अँकर (वेबसाठी) - जागा ३ (वडाळा ऑफिससाठी)
- पत्रकारितेचे पदवी, डिप्लोमा किंवा पदव्युत्तर शिक्षण
- सोशल मीडियावर सतर्क राहण्याची आवड
- चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची सवय
- लिखाणाद्वारे तत्काळ प्रतिसाद देण्याची आवड
- ऑन कॅमेरा मुलाखती, घटनांचे विश्लेषण करण्याची तयारी
- ऑन फिल्ड रिपोर्टिंग करण्याची तयारी
- शिफ्टनुसार काम करण्याची तयारी (स. ११ ते सायं, ७ व दु. २.३० ते रा.१०.३० वाजेपर्यंत)
(टीप - मुलाखतीची आणि परीक्षेची वेळ अधिकृत ई-मेलद्वारे आणि फोनवर कळविण्यात येईल. त्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही क्रमांकावर संपर्क करू नये. वरील कुठल्याही मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.)
7. डीटीपी ऑपरेटर (वडाळा, मुंबईसाठी)
• वृत्तपत्रात किमान १ वर्षे बातम्या आणि लेखांच्या पानांचा पेजिनेशनचा अनुभव
• Adobe InDesign, Photoshop, CorelDraw, MS Office सारखी सॉफ्टवेअर नीट हाताळण्याचे कौशल्य
• मराठी, इंग्रजी टायपिंगचा चांगला Speed
• उत्तम डिझायनिंग आणि लेआउटसाठी कल्पक वृत्ती
• वृत्तपत्रातील जाहिराती तयार करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
पत्रकारितेचे शिक्षण नाट्य, चित्रपट व मनोरंजन क्षेत्राची जाण सोशल मीडियावर सतर्क राहणे व चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची आवड लिखाणाच्या माध्यमातून तात्काळ प्रतिसाद देण्याची सवय मुलाखत घेण्याचे कौशल्य व मराठी भाषेवर प्रभुत्व
• संप्रेषण, पत्रकारिता विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण • वृत्तपत्रीय वाचनाची आणि लिखाणाची आवड • पर्यावरणविषयक सोशल मीडियावर अभिव्यक्त होण्याची सवय • मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि अनुवाद कौशल्य अत्यावश्यक • पर्यावरण व वन्यजीवविषयक मूलभूत ज्ञान आवश्यक • पर्यावरणीय संज्ञा, संकल्पना व आढाव्याचे ज्ञान • अँकरिंगसाठी इच्छुक उमेदवारांना प्राधान्य
दादर | मुंबई
आपला CV आम्हाला [email protected] वर दि. १५ मार्च, २०२६ पर्यंत ईमेल करा
अर्ज करताना ईमेलच्या 'Subject Box' मध्ये “पर्यावरण प्रतिनिधी” असे स्पष्टपणे नमूद करावे!
13. संदर्भ सहाय्यक
संदर्भ सहाय्यक (Reference Assistant), दादर (वडाळा), मुंबई
पात्रता
• वृत्तपत्रीय व अवांतर वाचनाची आवड • चालू घडामोडींचे विविध पैलूंवर आकलन करण्याची क्षमता • अचूक व नेमके संदर्भ शोधण्याचे कौशल्य • मराठी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व • माध्यम क्षेत्रात संशोधनकार्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
कामकाजाची वेळ
सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३०
आपला CV खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावा. ईमेल - [email protected]अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये "संदर्भ सहाय्यक पदासाठी अर्ज" असे स्पष्टपणे नमूद करावे.
14. क्रीडा प्रतिनिधी, दादर (वडाळा), मुंबई
• पत्रकारितेचे शिक्षण, संगणकाचे अद्यावत ज्ञान अनिवार्य • सोशल मीडियावर सतर्क राहण्याची आवड, तंत्रज्ञानाची जाण • क्रीडा विश्वातील स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती ठेवण्याची सवय • लिखाणातून तत्काळ प्रतिसाद देण्याची आवड• मुलाखती, घटनांचे तत्काळ विश्लेषण करण्याची तयारी