दै.मुंबई तरुण भारतमध्ये विविध पदांसाठी भरती!

24 Mar 2026 21:08:52

Job Post By Mumbai Tarun Bharat
 
 
मुंबई (Mumbai Tarun Bharat Job Vacancy) : माध्यम क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दै.मुंबई तरुण भारतर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, दै.'मुंबई तरुण भारत' आणि Maha MTB या संस्थेत विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वडाळा, दादर येथील कार्यालयासाठी मुलाखत आणि लेखी परीक्षेअंती ही निवड केली जाणार आहे.
 
दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पुढील पदांसाठी नोकरीची संधी
 
1. उपसंपादक (दैनिकासाठी) - मुंबई
 
दै. मुंबई तरुण भारतच्या मुख्य आवृत्तीसाठी वृत्तपत्रात (न्यूज डेस्क) संपादकीय कामकाजाचा किमान २ ते ३ वर्षांचा पूर्णवेळ अनुभव असलेले उपसंपादक पाहिजेत.
पात्रता
• पत्रकारितेचे (पदवी/पदविका शिक्षण)
• वृत्तपत्रीय वाचन व लिहिण्याची आवड
• मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
• बातम्यांची उत्तम जाण व वृत्तसंपादनाचे कौशल्य
• संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक
• वेब माध्यमांवर अभिव्यक्त होण्याची सवय
• त्वरीत न्यूज ब्रेक करण्याच्या उमेदवारांना प्राधान्य
🕒 कामकाजाची वेळ – दुपारी 2.30 ते रात्री 10.30
📍 कामाचे ठिकाण – मुंबई
आपला CV आणि सोबत प्रकाशित बातम्या/लेख/लिंक्स ईमेल करा:mahamtbjobs@gmail.com
 
2. उपसंपादक - अँकर (वेबसाठी) - जागा ३ (वडाळा ऑफिससाठी)
 
- पत्रकारितेचे पदवी, डिप्लोमा किंवा पदव्युत्तर शिक्षण
- सोशल मीडियावर सतर्क राहण्याची आवड
- चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची सवय
- लिखाणाद्वारे तत्काळ प्रतिसाद देण्याची आवड
- ऑन कॅमेरा मुलाखती, घटनांचे विश्लेषण करण्याची तयारी
- ऑन फिल्ड रिपोर्टिंग करण्याची तयारी
- शिफ्टनुसार काम करण्याची तयारी (स. ११ ते सायं, ७ व दु. २.३० ते रा.१०.३० वाजेपर्यंत)
अर्ज करण्यासाठी आपला CV - mahamtbjobs@gmail.com वर ईमेल करा.
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'उपसंपादक - अँकर (वेबसाठी) या पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे.)
 
3.विशेष प्रतिनिधी (बिझनेस, ट्रेड आणि बँकींग) - जागा १ (वडाळा ऑफिससाठी)
 
- वाणिज्य शाखेशी संबंधित पदवीसह पत्रकारितेचे शिक्षण असल्यास प्राधान्य
- अर्थउद्योग विषयक वार्तांकन/संपादनाचा किमान २-३ वर्षांचा अनुभव
- मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
- अर्थविषयक घडामोडींवर बातम्या, लेख लिहिण्यासह ऑन कॅमेरा मुलाखतीचे कौशल्य
- सोशल मीडियावर सतर्क राहाणे व अर्थ क्षेत्रातील चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची आवड
- कामकाजाची वेळ - सकाळी ११.०० ते ७.३०
- अर्ज करण्यासाठी आपला CV - mahamtbjobs@gmail.com वर ईमेल करा.
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'विशेष प्रतिनिधी (बिझनेस, ट्रेड आणि बँकींग) या पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे.)
 
4. मुद्रित शोधक - जागा १ (वडाळा ऑफिससाठी)
 
- मराठी भाषेचे व्याकरणदृष्ट्या ज्ञान आवश्यक
- मराठी, संस्कृत भाषा, साहित्य इत्यादिशी संबंधित शिक्षण असल्यास प्राधान्य
- मुद्रित माध्यमांमध्ये मुद्रितशोधनाचा किमान २ वर्षांचा पूर्ण वेळ अनुभव
- संगणकावर मुद्रितशोधनाचे कौशल्य
- वृत्तपत्रीय वाचन आणि लिखाणाची आवड
- वयोमर्यादा २५ ते ४०
- त्वरित रुजू होऊ शकणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
- कामकाजाची वेळ - दुपारी २.३० ते रात्री १०.३०
- अर्ज करण्यासाठी आपला CV - mahamtbjobs@gmail.com वर ईमेल करा.
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'मुद्रित शोधक या पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे)
 
5. दैनिकासाठी वार्ताहर (नाशिक शहर आणि ग्रामीण)
 
- पत्रकारितेचे (पदवी/पदविका ) शिक्षण
- वृत्तपत्रीय वाचन व लिखाणाची आवड
- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
- बातम्यांची उत्तम जाण व वृत्तपत्र गांभीर्याने वाचण्याची सवय
- संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक
- वेब माध्यमांवर अभिव्यक्त होण्याची सवय
- त्वरित रुजू होऊ शकणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
- वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे
आपला CV आणि सोबत स्वलिखित बातम्या/लेख/लिंक्स ईमेल करा. ईमेल - mahamtbjobs@gmail.com
(अर्ज करताना ईमेलच्या Subject Box मध्ये 'दैनिकासाठी वार्ताहर नाशिक शहर आणि ग्रामीण पदासाठी अर्ज' असे स्पष्टपणे नमूद करावे.)
 
6.महाएमटीबी पेड इंटर्नशीप प्रोग्राम (संपादकीय आणि कॅमेरा व एडीटींग विभागासाठी)
 
- पत्रकारितेची पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण
- वृत्तपत्रीय वाचन व लिखाणाची आवड
- मराठी भाषा आणि संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक
अटी व शर्ती
- इंटर्नशीप पूर्वी प्रवेश परीक्षा व मुलाखत होईल ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
- इंटर्नशीपसाठी दर महा दोन हजार रुपये मानधन दिले जाईल
- मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेचा लाभ* (अटी शर्ती लागू)
- इंटर्नशीप संस्थेच्या नियमानुसार पूर्ण करणाऱ्यालाच अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल.
- इंटर्नच्या कामगिरी अनुरुप नोकरीची संधी (मात्र, याचा अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या हाती असेल)
(अर्ज करण्यसाठी CV interns.mtbedit@gmail.com या ईमेलवर पाठवावा.)
(टीप - मुलाखतीची आणि परीक्षेची वेळ अधिकृत ई-मेलद्वारे आणि फोनवर कळविण्यात येईल. त्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही क्रमांकावर संपर्क करू नये. वरील कुठल्याही मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.)
 
7. डीटीपी ऑपरेटर (वडाळा, मुंबईसाठी)
 
• वृत्तपत्रात किमान १ वर्षे बातम्या आणि लेखांच्या पानांचा पेजिनेशनचा अनुभव
• Adobe InDesign, Photoshop, CorelDraw, MS Office सारखी सॉफ्टवेअर नीट हाताळण्याचे कौशल्य
• मराठी, इंग्रजी टायपिंगचा चांगला Speed
• उत्तम डिझायनिंग आणि लेआउटसाठी कल्पक वृत्ती
• वृत्तपत्रातील जाहिराती तयार करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
कृपया आपला CV mahamtbjobs@gmail.com या ईमेलवर पाठवा.
Subject Box मध्ये DTP Operator असा स्पष्ट उल्लेख करावा.
 
8. ग्राफिक डिझायनर (वडाळा, मुंबईसाठी)
 
• वृत्तपत्रात किमान 2 वर्षे प्रिंट व सोशल मीडिया Designing चा अनुभव
• Adobe InDesign, Photoshop, CorelDraw, Adobe Illustrator सारखी सॉफ्टवेअर नीट हाताळण्याचे कौशल्य
• मराठी, इंग्रजी टायपिंगचा चांगला Speed
• उत्तम डिझायनिंग आणि लेआउटसाठी कल्पक वृत्ती
• वृत्तपत्रातील जाहिराती तयार करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
• आपला CV mahamtbjobs@gmail.com या आयडीवर ईमेल करावा
आणि Subject box मध्ये ‘Graphic Designer पदासाठी अर्ज’ असे स्पष्टपणे नमूद करावे.
 
9.ठाणे ब्युरो चीफ (ठाणे)

पात्रता
• पत्रकारितेचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण
• ठाणे महानगरपालिकेशी निगडीत विषयांचे सखोल ज्ञान
• लोकप्रतिनिधी, विभागीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याची सवय
• ठाण्यातील राजकीय घडामोडी, नागरी समस्यांचे विविध पैलू आकलन करण्याची क्षमता
• दैनंदिन ताज्या विषयांवर व्हिडिओच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची सवय
• ठाणे महानपालिका, ठाणे प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
• मुलाखत घेण्यासाठीचे कौशल्य व मराठी भाषेवर प्रभुत्व
आपला CV mahamtbjobs@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवा.
Subject Box मध्ये ठाणे शहर प्रतिनिधीसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.
 
10. Designation: Head of Sales (Mumbai) 
 
REQUIREMENT
 
• Experience: 5 to 10 years in relevant field
• Qualification: MBA / Graduate in Marketing, Business Administration, or related field
• Develop and execute sales strategies to achieve revenue targets for Mumbai Tarun Bharat (Print, Digital & Event).
• Identify new clients and maintain strong relations with advertisers and agencies.
• Collaborate with editorial and marketing teams for integrated campaigns.
• Drive innovative advertising solutions across Print, Digital, and Events.
SALARY: ₹80,000 – ₹1,20,000 PER MONTH
Send Your CV to: mahamtbjobs@gmail.com

11. मनोरंजन प्रतिनिधी 

 पत्रकारितेचे शिक्षण
 नाट्य, चित्रपट व मनोरंजन क्षेत्राची जाण
 सोशल मीडियावर सतर्क राहणे व चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची आवड
 लिखाणाच्या माध्यमातून तात्काळ प्रतिसाद देण्याची सवय
 मुलाखत घेण्याचे कौशल्य व मराठी भाषेवर प्रभुत्व

📧 संपर्क : mahamtbjobs@gmail.com



Powered By Sangraha 9.0