Colombia Military Plane Crash: कोलंबियात हवाई दलाचे विमान कोसळले! ६६ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये जवानांची संख्या अधिक

24 Mar 2026 15:42:01

Colombia Military Plane Crash

मुंबई : (Colombia Military Plane Crash)
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये एक भीषण विमान अपघात झाला असून सोमवारी घडलेल्या या दुर्घटनेत जवळपास ६६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. एसोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार. मृत आणि जखमींमध्ये जवानांची संख्या अधिक आहे. विमानात १२१ जवान आणि क्रू सदस्य होते, उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात हे विमान कोसळले असल्याचे वृत्तात म्हटले आहे. बचावकार्य सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.(Colombia Military Plane Crash)

हर्क्युलस सी-१३० विमानाचा अपघात

प्युएर्ती लेगुइझामो शहराच्या उपमहापौर कार्लोस .यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "हवाई दलाच्या अमेरिकन बनावटीच्या हर्क्युलस सी-१३० या विमानाने सोमवारी उड्डाण केल्यानंत थोड्याच वेळात, ते कोलंबियाच्या पुटुमायो प्रांतातील प्युएर्ती लेगुइझामो शहराजवळ कोसळले". अधिकच्या माहितीनुसार, या विमानात ११० सैनिक आणि ११ कर्मचारी प्रवास करत होते. १२१ प्रवासी असलेल्या या विमानातील ६६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर मृतदेह जवळच्या रुग्णालयात ठेवण्यात आले. तर, जखमींवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना शहरात स्थलांतरित करण्यात आले.(Colombia Military Plane Crash)

कोलंबियात क्रॅश झालेले हर्क्युलस सी-१३० विमान अमेरिकेने २०२० मध्ये दान केल्याची माहिती हवाई दलाच्या तज्ज्ञांनी दिली. तीन वर्षापूर्वीच त्याची संपूर्ण सुरक्षा तपासणी करण्यात आली व महत्वाचे भाग बदलण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. कोलंबियातल्या सैनिकांच्या वाहतुकीसाठी या विमानाचा वापर होत होता.(Colombia Military Plane Crash)


Powered By Sangraha 9.0