Shambhuraj Desai police clash: मंत्र्यांनाच पोलिसांची धक्काबुक्की! सातारा प्रकरणावर विधानसभेत तुफान राडा; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

23 Mar 2026 17:22:22
 
Shambhuraj Desai police clash
 
मुंबई: (Shambhuraj Desai police clash) सातारा जि. प. निवडणूकीदरम्यान पोलिसांनी एका मतदाराला मतदानापासून वंचित ठेवत पालकमंत्री शंभुराजे देसाई यांना धक्काबुक्की केल्याचा मुद्दा सोमवारी विधानपरिषदेत गाजला. यावरून शिवसेनेचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. (Shambhuraj Desai police clash)
 
आ. अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, "सातारा जिल्हा परिषद निवडणूकीदरम्यान घडलेली घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. मतदाराला पोलिसांकडून अडवण्यात आल्याची घटना यापूर्वी कधीही घडली नाही. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. ही अत्यंत गंभीर घटना आहे. राज्याचे मंत्री सुरक्षित नसल्यास सामान्य माणसांची काय अवस्था आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Shambhuraj Desai police clash)
 
पोलिसांना बडतर्फ करा - मंत्री शंभुराजे देसाई
 
साताऱ्यात घडलेल्या घटनेची माहिती सभागृहाला देताना मंत्री शंभुराजे देसाई म्हणाले की, "मी पक्षाचा प्रतोद असून निवडणूकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावण्यासाठी मी तिथे उपस्थित होतो. माझ्यासोबत दोन सदस्य मतदानासाठी जात असताना १०० पोलिसांनी आम्हाला अडवले आणि एखादा आरोपी फरफटत नेतात याप्रमाणे मला आणि त्या सदस्यांना नेले. मला मुका मार लागला असून चार दिवसांपासून मी गोळ्या घेत आहे. आमच्याकडे ३३ सदस्य होते आणि त्यांना ते सदस्य कमी करायचे होते. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक तुषार दोषी, एलसीबीचे पोलिस निरिक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे यांच्यासह त्याच्यांसोबत असलेल्या १०० पोलिसांना विधानपरिषद सभागृहात उपसभापतींनी निलंबित केले आहे. या सभागृहात त्यांना बडतर्फ करावे," अशी मागणी त्यांनी केली. (Shambhuraj Desai police clash)
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले की, "साताऱ्या जिल्ह्यातील घटनेचा मीसुद्धा साक्षीदार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मला शंभुराज देसाई यांनी फोन करून दोन मतदारांवर जुना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. परंतू, त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नका, असे मी तुषार दोषी यांना फोन करून सांगितले. पोलिस महासंचालकांनाही फोन करून याबद्दल सांगितले. यावर त्यांनी आमचे लोक कुठल्याही परिस्थितीत सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवणार नसल्याचे सांगितले. पण त्यानंतरही त्यांना अडवण्यात आले. पोलिस मंत्र्यांना आणि मतदारांना आरोपीप्रमाणे पकडून घेऊन गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली." (Shambhuraj Desai police clash)
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केले. (Shambhuraj Desai police clash)
 
"सातारा जिल्हा परिषद निवडणूकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. हजारों कार्यकर्ते जिल्हा परिषदेत घुसले असताना निवडणूक कशी पुढे जाणार? भाजपने गुन्हा दाखल केल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. परंतू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जि.प. सदस्याचे अपहरण झाल्याची तक्रार पहिल्यांदा त्यांच्या चिरंजीवांनी केली. त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक मारहाण झाल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न सुरु असून ते वस्तुस्थितीला धरून नाही. हा फक्त वातावरण निर्मिताचा प्रयत्न आहे. पोलिसांनी लोकशाहीचा गळा घोटला नसून पालकमंत्र्यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक होऊ दिली नाही. हे लोकशाहीला मारक आहे. साताऱ्यात घडलेली घटना घडवण्यामागे पालकमंत्र्यांची सर्वात मोठी भूमिका आहे." (Shambhuraj Desai police clash)
- मंत्री जयकुमार गोरे (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0