Gold Rate Drop: सोने-चांदी कोसळलं! एका दिवसात हजारोंची घसरण; दर आणखी घसरणार?

23 Mar 2026 15:07:49
 
Gold Rate Drop
 
मुंबई: (Gold Rate Drop) भारतीय सराफा बाजारात सोमवार, दि. २३ मार्च रोजी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. (Gold Rate Drop)
 
आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,३५,१४१ रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. गेल्या शुक्रवारी हा दर १,४७,२१८ रुपये होता, म्हणजेच एका दिवसात तब्बल १२,०७७ रुपयांची घसरण झाली आहे. (Gold Rate Drop)
 
२२ कॅरेट सोन्याचा दरही मोठ्या प्रमाणात घसरला असून तो आज १,३४,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. यामध्ये १२,०२८ रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी हा दर १,४६,६२८ रुपये होता. (Gold Rate Drop)
 
१८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही घसरण कायम असून आजचा दर १,२३,७८९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. यापूर्वी हा दर १,३४,८५२ रुपये होता, म्हणजेच ११,०६३ रुपयांची घट झाली आहे. (Gold Rate Drop)
 
दरम्यान, Bullions.co.in च्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून येत असून ते १,४५,५२० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. (Gold Rate Drop)
 
चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. IBJA नुसार, आज एक किलो चांदीचा दर २,०१,५०० रुपये इतका आहे, जो शुक्रवारी २,३२,३६४ रुपये होता. म्हणजेच चांदी ३०,८६४ रुपयांनी स्वस्त झाली आहे. मात्र, Bullions.co.in वर चांदीचा दर २,२७,९६० रुपये प्रति किलो असून तिथे हलकी वाढ दिसून येत आहे. IBJA दररोज दोन वेळा सोन्या-चांदीचे दर जाहीर करत असल्याने बाजारातील चढ-उतारावर गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष आहे. (Gold Rate Drop)
 
 
Powered By Sangraha 9.0