Health Scheme: महात्मा फुले जन आरोग्य योजनेत चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करणार

23 Mar 2026 18:03:47
 
Health Scheme
 
 
मुंबई : (Health Scheme) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट रूग्णालये मोफत उपचार देत नसतील तर त्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले. (Health Scheme)
 
आ. अभिजित पाटील यांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांत उपचार पद्धती मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आ. अतुल भातखळकर, संजय केळकर आणि योगेश सागर यांनी या चर्चेत सहभाग घेतला. (Health Scheme)
 
यावर उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना ही एकही रुपया न घेता लोकांना मोफत उपचार देण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत जो कुणी चुकीचे काम करेल त्याची आठवडाभरात चौकशी करून तात्काळ कारवाई करू." (Health Scheme)
 
"महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मुंबई उपनगरामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी रुग्णालये आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत उपनगरातील रुग्णालये वाढवण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार का?" असा प्रश्न आ. अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. (Health Scheme)
 
यावर उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "मुंबई महापालिकेच्या सगळ्या प्रभागांमध्ये या योजनेत जास्तीत जास्त रुग्णालयांचा सहभाग व्हावा, यासाठी आम्ही काही प्रयत्न करत आहोत. या विभागातील सगळ्या आमदारांना घेऊन इथल्या रुग्णालयांमध्ये आणि विशेषत: ट्रस्टमध्ये सार्वजनिक न्यास नोंदणीमध्ये असलेल्या रुग्णालयांना सक्तीने समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना मोफत आरोग्य उपचार मिळतात. त्यामुळे आपल्या जवळच्या रुग्णालयांचा यात समाविष्ट करण्याबाबत सर्वांनी प्रयत्न करावे,” असे आवाहन त्यांनी केले. (Health Scheme)
 
 
Powered By Sangraha 9.0