India Terrorism Report 2026: भारतात दहशतवाद ४३% ने घटला, पण एक धक्कादायक...

22 Mar 2026 17:22:34
 
India Terrorism Report 2026
 
मुंबई: (India Terrorism Report 2026) भारतासाठी एक मोठी सकारात्मक बातमी आहे. गेल्या एका वर्षात देशातील दहशतवादी घटनांमध्ये तब्बल ४३% घट नोंदवली गेली आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६ च्या अहवालानुसार, भारत आता १३व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील वर्षी भारत ११व्या स्थानावर होता, त्यामुळे यंदा दोन स्थानांनी घसरण झाली असली तरी दहशतवादी घटनांमध्ये झालेली घट हा दिलासा देणारा मुद्दा आहे. (India Terrorism Report 2026)
 
या अहवालात एक महत्त्वाची बाब म्हणजे, दक्षिण आशिया सलग दहाव्या वर्षी दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित क्षेत्र राहिले आहे. यावरून या भागातील सुरक्षा आव्हाने अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. (India Terrorism Report 2026)
 
दरम्यान, जागतिक स्तरावर काही सकारात्मक बदलही दिसून आले आहेत. २०२५ मध्ये दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २८% घट झाली आहे. तसेच, दहशतवादी हल्ल्यांची संख्या सुमारे २२% नी कमी होऊन २,९४४ इतकी झाली आहे. एकूण ८१ देशांमध्ये परिस्थिती सुधारली असताना १९ देशांमध्ये परिस्थिती अधिक बिघडली आहे. (India Terrorism Report 2026)
 
मात्र, या सकारात्मक चित्रामागे एक गंभीर आणि धक्कादायक ट्रेंडही समोर आला आहे. पश्चिम देशांमध्ये दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये तब्बल २८०% वाढ झाली आहे. युरोपियन युनियनच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये १४ EU देशांमध्ये एकूण ५८ दहशतवादी हल्ले नोंदवले गेले. (India Terrorism Report 2026)
 
याशिवाय, पाकिस्तान हा या यादीत सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे, तर अफगाणिस्तानमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्याने तो आता टॉप-१० यादीतून बाहेर पडला आहे. एकूणच, भारतासाठी ही आशादायक बातमी असली तरी जागतिक पातळीवर दहशतवादाचे बदलते स्वरूप आणि नव्या ठिकाणी वाढणारा धोका हे मोठे चिंतेचे कारण ठरत आहे. (India Terrorism Report 2026)
 
 
Powered By Sangraha 9.0