मुंबई : (Uddhav Thackeray) मुंबईत एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर जोरदार भाष्य केले. या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकरणांवर संताप व्यक्त करत थेट कारवाईची मागणी केली. (Uddhav Thackeray)
“ओम फट स्वाहा…” म्हणत ठाकरेंचा इशारा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अजून किती खालच्या पातळीवर आपण जाणार आहोत?” राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही, त्याची अंमलबजावणी करणारेच जर अशा भोंदूगिरीच्या नादी लागले, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. (Uddhav Thackeray)
तसेच, “गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या मागे कोणत्याही पक्षाचा झेंडा असला तरी,” असेही ते म्हणाले. (Uddhav Thackeray)
महाविकास आघाडीवरही स्पष्टीकरण
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही संबंधित भोंदूबाबाला मदत झाल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, “सगळ्यांची चौकशी करा, पाणी कुठपर्यंत मुरलंय ते समोर येऊ द्या.” (Uddhav Thackeray)