मुंबई: (Revati Sule Marriage) मुंबईत पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मोठा सोहळा रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. (Revati Sule Marriage)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा विवाह २० जून रोजी मुंबईत अत्यंत शाही थाटात पार पडणार आहे. (Revati Sule Marriage)
मुंबईत शाही सोहळा, देशभरातील दिग्गज उपस्थित राहणार...
हा विवाहसोहळा मुंबईतील एका नामांकित ठिकाणी पार पडणार असून, पवार आणि लखानी कुटुंबाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या लग्नाला महाराष्ट्रासह देशातील अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Revati Sule Marriage)
तीन शहरांत भव्य रिसेप्शन, फक्त लग्नच नव्हे तर त्यानंतरचे स्वागत समारंभही तितकेच भव्य असणार आहेत: (Revati Sule Marriage)
मुंबई – पहिला रिसेप्शन
नागपूर – वरपक्षासाठी खास कार्यक्रम
नवी दिल्ली – राष्ट्रीय पातळीवरील दिग्गजांसाठी भव्य स्वागत
सारंग लखानी कोण आहेत?
सारंग अरुण लखानी हे नागपूरचे असून, ते विश्वराज ग्रुप चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. ते एक कुशल बॅडमिंटनपटू असून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळले आहेत. (Revati Sule Marriage)