मुंबई: (Megablock Update) मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेकडून १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी रविवार, २२ मार्च २०२६ रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. (Megablock Update)
ट्रान्स-हार्बर मार्ग पूर्णपणे बंद...
स्थानक: ठाणे ते वाशी / नेरूळ
वेळ: सकाळी ११:१० ते दुपारी ४:१०
अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद असेल, ज्यामुळे या कालावधीत कामावर जाणारे आणि सुट्टीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. (Megablock Update)
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक...
स्थानक: वसई रोड ते विरार
वेळ: शनिवारी मध्यरात्रीनंतर १२:१५ ते रविवारी पहाटे ४:१५
अप-डाउन मार्गावर काही लोकल फेऱ्या रद्द (Megablock Update)
प्रभादेवीत विशेष ब्लॉक (पूल पाडण्यासाठी)
स्थानक: प्रभादेवी
वेळ: रात्री १:३० ते सकाळी ६
काम: उड्डाणपुलाचे गर्डर हटवण्याचे काम करण्यात येणार आहे, ज्यामुळे चर्चगेट ते प्रभादेवी दरम्यान काही काळ सेवा बंद राहिल. माटुंगा रोड आणि माहीम येथे लोकल बंद असतील. मेल-एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम होईल. त्यासोबतच, काही लांब पल्ल्याच्या गाड्या ३० मिनिटे ते २ तास उशिराने धावणार आहेत. (Megablock Update)
मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत अतिरिक्त ब्लॉक...
ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवर फलाट विस्ताराचे काम
वेळ: रात्री १२ ते सकाळी १०
काही लोकल फेऱ्या रद्द (Megablock Update)