मुंबई: (Gold Price Drop) गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सतत होत असलेली वाढ खरेदीदारांच्या खिशाला मोठा धक्का मानली जात होती. मात्र, अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. LKP सिक्युरिटीज चे विश्लेषक जतीन त्रिवेदी यांच्या अंदाजानुसार, सोन्याचे दर अजूनही खाली येण्याची शक्यता आहे. (Gold Price Drop)
सध्याचे दर काय सांगतात?
मुंबईत सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, २४ कॅरेट सोने ₹१,५१,०७० प्रति १० ग्रॅम आहे. तर, २२ कॅरेट सोने ₹१,३८,४९० प्रति १० ग्रॅम आहे. हे दर कालच्या तुलनेत तब्बल ₹३,७१० ने कमी झाले आहेत. विविध बाजारांमध्ये सध्या सोन्याचे दर ₹१.३५ लाख ते ₹१.५२ लाखांच्या दरम्यान आहेत. (Gold Price Drop)
घसरणीमागची कारणे काय?
सध्या शेअर मार्केतमध्ये सुरू असलेली घसरण, जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेड, तांत्रिक निर्देशकांचा दबाव आणि गुंतवणूकदारांचा कमी झालेला कल या कारणाने सोन्याचे दर घसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत ₹६,००० पेक्षा जास्त घसरण झाली आहे. यासोबतच चांदीच्या दरातही जवळपास ₹२५,००० ची घट नोंदवली गेली आहे. (Gold Price Drop)
तज्ज्ञांच्या मते, सध्या सोन्याचा ट्रेड कमकुवत आहे. भाव ₹१.४० लाख ते ₹१.४७ लाख दरम्यान राहू शकतात. दबाव वाढल्यास दर ₹१.३५ लाख आणि पुढे ₹१.२७ लाखांपर्यंत घसरण्याची शक्यता (Gold Price Drop)
खरेदीसाठी योग्य वेळ?
तज्ज्ञांच्या मते, दर कमी होत असल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी ठरू शकते. मात्र, बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक सुरक्षित मानले जात आहे. (Gold Price Drop)