Trump Takaichi Meeting :"तुम्ही मला पर्ल हार्बरबद्दल का नाही सांगितलं?" ट्रम्प यांचा जपानच्या पंतप्रधानांना खोचक सवाल

20 Mar 2026 14:34:39

Trump Takaichi Meeting


मुंबई : (Trump Takaichi Meeting)
मध्यपूर्वेत इराणसोबतच्या युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक राजकारण तापलेले आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी झालेली भेट ही चर्चचा विषय ठरली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना एका जपानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना जपानच्या जुन्या जखमांना उजाळा देत खोचक प्रश्न विचारला, ज्यामुळे सभागृहात स्पष्ट तणाव निर्माण झाल्याचे दिसत होते. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.(Trump Takaichi Meeting)

पर्ल हार्बरबद्दल माहिती का नाही दिली?

माध्यमांच्या वृत्तानुसार, एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, "इराणवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मित्र राष्ट्रांना (विशेषतः जपानला) माहिती का दिली नाही." ट्रम्प यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, हल्ल्यांचा आश्चर्याचा धक्का कायम ठेवण्यासाठी ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर विनोद करण्याच्या नादात त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायक घटनेचा संदर्भ दिला. "आम्ही कोणालाही सांगितले नाही, कारण आम्हाला अनपेक्षित हल्ला करायचा होता, आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. आणि असा अनपेक्षित हल्ला करणं हे जपानपेक्षा चांगले कोणाला माहीत असणार? ताकायची यांच्याकडे पाहत ते पुढे असेही म्हणाले, "तुम्ही मला पर्ल हार्बरबद्दल का सांगितले नाही?" हा उल्लेख पर्ल हार्बरवरील हल्ल्याचा होता, ज्यामध्ये जपानी सैन्याने अचानक हल्ला करून २,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता.(Trump Takaichi Meeting)


ट्रम्प यांच्या प्रश्नावर ताकायची यांचे मौन 

या वक्तव्यावर सानाए ताकायची यांनी कोणतीही शब्दांत प्रतिक्रिया दिली नाही, परंतु त्यानंतर त्या अस्वस्थ दिसल्या. त्यांची देहबोलीच बरेच काही सांगून गेली. त्यांनी डोळे मोठे केले, खुर्चीत मागे टेकल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य क्षणात नाहीसे झाले. ताकायची यांनी या टिप्पणीवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आणि ट्रम्प यांच्याशी नम्रपणे संवाद सुरू ठेवला. दोन्ही राष्ट्र प्रमुखांमधील ही भेट एक नेहमीची राजनैतिक भेट ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती एका विचित्र संवादात रूपांतरित झाली त्यांच्या हालचालींमधून अस्वस्थता जाणवत होती.(Trump Takaichi Meeting)



Powered By Sangraha 9.0