US-Israel-Iran War : श्रीलंकेने अमेरिकी लढाऊ विमानांना हद्दीत उतरण्याची परवानगी नाकारली, राष्ट्रपती म्हणाले, "दबावाला..."

20 Mar 2026 19:52:59

US-Israel-Iran War

मुंबई : (US-Israel-Iran War) अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असतानाच श्रीलंकेने अमेरिकी लढाऊ विमानांना श्रीलंकेच्या हद्दीत उतरण्याची परवानगी नाकारत तटस्थतेची भूमिका घेतली आहे. अमेरिकेने श्रीलंकेकडे लढाऊ विमाने उतरवण्याबाबत विनंती केली होती, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी हे भाष्य केले आहे.(US-Israel-Iran War)
 
श्रीलंकेने काय म्हटलं?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, "या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिणेकडील एका नागरी विमानतळावर दोन लष्करी विमाने तैनात करण्याच्या अमेरिकेच्या विनंतीला आम्ही नकार दिला", असे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी स्पष्ट केले आहे.(US-Israel-Iran War)
"अमेरिकेने जिबूतीमधील एका विमान तळावरून दोन लढाऊ विमाने श्रीलंकेच्या दक्षिण भागातील मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, २६ फेब्रुवारी रोजी सादर केलेली ही विनंती आम्ही श्रीलंकेची तटस्थता जपण्यासाठी आणि संघर्षातील कोणत्याही बाजूला पाठिंबा किंवा विरोध अशी भूमिका न घेता अमेरिकेच्या लढाऊ विमानांना प्रवेश नाकारला", असे अनुरा कुमार दिसानायके यांनी म्हटले आहे.(US-Israel-Iran War)


Powered By Sangraha 9.0