मुंबई : (Vikram Gokhale) मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर तब्बल ३ वर्षांनी त्यांचा शेवटचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँज करण्यात आले असुन आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रटाचे नाव 'बेवारस' असुन यात दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात त्यांनी अनाथलय चालवण्याऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका साकारली आहे. एक लहान अनाथ मुलगा आपल्या अधिकारांसाठी आपल्याच आई वडिलांना कोर्टात का खेचतो? या लहान मुलाच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.
हेही वाचा : dhurandhar 2: दाऊद इब्राहिमची भूमिका कोणी साकारली? नाव ऐकून व्हाल थक्क...
पोस्टरमध्ये विक्रम गोखले भाऊक होऊन एका लहान मुलाला मिठी मारताना दिसत आहेत. या चित्रपटात अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख कलाकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
याआधी 'सूर लागू दे' हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याची चर्चा होती. परंतु आता 'बेवारस' हा त्यांचा शेवडचा चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे. सध्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असले तरी रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र लवकरच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विक्रम गोखले यांचे 26 नोव्हेंबर 2022 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं होते. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे.