‘धुरंधर 2’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सीन व्हायरल; नेमकं सत्य काय?

20 Mar 2026 19:05:35
Dhurandhar 2
 
मुंबई : (Dhurandhar 2) आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट ‘धुरंधर’ची सध्या सर्वेत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक ब्लाँकबस्टर चित्रपटाचे रेकाँर्ड तोडले आहेत. सध्या या चित्रपटातील एका सीन सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या सीन मध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची झलक दिसत असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
‘धुरंधर 2’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही झलक पाहायला प्रेक्षकांना पाहायला मिळाली असली तरी या चित्रपटात मोदीचा कॅमिओ आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
 
नेमके सत्य काय?
 
‘धुरंधर 2’मध्ये जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले असले तरी त्यांचा यात कॅमिओ नाही. मोदींनी चित्रपटात अभिनय केलेला नसून, चित्रपटात मोंदीची दिसणारी झलक म्हणजे, त्यांचे भाषण आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरचे मोदींच्या विजयाच्या भाषणाचे फुटेज यात वापरले आहे. ही क्लिप अत्यंत प्रभावीपणे एका देशभक्तीपर सीन मध्ये वापरली आहे.
 
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा सीन सोशल मिडियावर व्हायरल होत असुन नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी “मोदींचा सिनेसृष्टीत डेब्यू झाला” अश्या मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0