सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची राजकीय खेळी

20 Mar 2026 17:20:18
BJP Makes History in Satara
 
सातारा : (Devendra Fadnavis)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला आहे. ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे.
 
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दिसून आलेला भाजपचा करिश्मा सातारा जिल्ह्यातही स्पष्टपणे पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ केवळ २८ सदस्यांपर्यंत मर्यादित असताना, मंत्री तथा जिल्ह्याचे सुपूत्र छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या राजकीय रणनीतीने अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण ३३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाच्या बाजूने उभा केला. याउलट शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला केवळ ३० मते मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले.
 
हेही वाचा : बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता समरसतेच्या मार्गाने शक्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड
 
दरम्यान, बहुमताच्या आधारे भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच राजू भोसले यांना उपाध्यक्ष पदी संधी मिळाली. या विजयामुळे साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपने आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, प्रभावी संवाद आणि संघटन कौशल्य यामुळे भाजपाला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.
 
 
Powered By Sangraha 9.0