Vishwa Marathi Sammelan 2026 : विश्व मराठी संमेलनात दादासासाहेब फाळके चित्रनगरीच्या दालनाचा डंका

02 Mar 2026 12:53:09

vishwa01

नाशिक (Vishwa Marathi Sammelan 2026) : नाशिक येथे सुरु असलेल्या विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून लक्षवेधी दालन पुरस्कार दालनास मिळाला आहे. जेष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी हा सन्मान स्विकारला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी उपस्थित होते.
 
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. पुरस्कार मिळाल्या बद्दल सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रासाठी विविध योजना - उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांची माहिती या दालनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यामध्ये एक खिडकी योजना, दर्जेदार मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य योजना, राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा, चित्रपताका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, चरित्रपट योजना यांच्यासह विविध उपक्रम, कार्यक्रम, अभियानाची माहिती देण्यात येत आहे. तसेच खास तरुण पिढी साठी कंटेंट क्रिएशन झोन तयार करण्यात आला होता. हा झोन सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे. या झोन ला तरुणांसह ज्येष्ठ नागरिक सुद्धा कंटेंट तयार करत आहेत. तसेच या दालनात नवोदित तरुणांना सिनेसृष्टीत काम करण्याचा संदेश देण्यात आला आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षणवर्ग चालवण्यात येत आहेत. त्याची अधिक माहिती या दालनात देण्यात आली.

Powered By Sangraha 9.0