वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी २' ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; पहिल्याच विकेंडला कमावले तब्बल...

02 Mar 2026 16:44:43

The Kerala Story 2

मुंबई : (The Kerala Story 2) गेल्या काही दिवसात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'द केरळ स्टोरी २' सिनेमा शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला न्यायालयीन स्तगिती ही देण्यात आली होती मात्र यानंतर केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती हटवल्यानंतर चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला. वाद आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. यामुळे या दिवशी केवळ ७५ लाखांचीच कमाई केली होती. मात्र विकेंडमध्ये या चित्रपटाने तुफान कमाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर ४.६५ कोटींची कमाई केली असुन रविवारी तब्बल ५ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकुण बजेट हे २८ ते ३० कोटी आहे. यामुळे पहिल्यांच आठवड्यातील १०.४० कोटींची कमाई ही कमाई समाधानकारक मानली जात आहे.

हेही वाचा : संजू सॅमसनची दमदार खेळी! किंग कोहलीचा मोडला १० वर्षापूर्वीचा 'हा' रेकॉर्ड
 
या चित्रपटाचे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह असुन यात उल्का गुप्ता, अदिती भाटिया व ऐश्वर्या ओझा यांनी प्रमुख भूमिका पार पाडली आहे. तरी आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०२३ मध्ये 'द केरळ स्टोरी' मध्ये अदा शर्मा मुख्य भुमिकेत दिसली होती. यावेळी त्या चित्रपटाने पहिल्यांच विकेंडला ३५.४३ कोटींची कमाई केली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0