संजू सॅमसनची दमदार खेळी! किंग कोहलीचा मोडला १० वर्षापूर्वीचा 'हा' रेकॉर्ड

02 Mar 2026 14:47:48
SANJU SAMSON AND VIRAT KOHLI
 
मुंबई : (T20 World Cup Update) टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारताने वेस्ट इंडिजवर दमदार विजय मिळवला आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो म्हणजे संजू सॅमसन! अवघ्या ५० चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी करत त्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. त्यांच्या या दमदार खेळीमुळे भारतीय संघ सेमी फायनलला पोहोचला आहे.
 
वेस्ट इंडिजने १९५ धावा करुन भारतीय संघासमोर मोठे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या धावसंख्येचे आव्हान पेलून हा विक्रमी विजय मिळवला आहे. संजूने नाबाद ९७ धावांची खेळी करत भारतीय संघाला सेमी फायनलला पोहोचला आहे. त्यांचे शतक ३ धावांनी हुकले असले तरी त्यांने विराट कोहलीचा १० वर्षापूर्वीचा विक्रमी रेकॉर्ड मोडला आहे.
 
हेही वाचा : हार्दिक पांड्याकडून पूर्वपत्नी आणि मुलगा अगस्त्य यांना ४ कोटीची आलिशान कार भेट...
 
याआधी विराटने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये २०१६ मध्ये आँस्टेलिया विरुध्द ५१ चेंडुत तर २०२२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ५३ चेंडुत खेळलेल्या या सामन्यात ८२ धावा केल्या होत्या. आता हा रेकॉर्ड संजूने आपल्या नावे केला आहे. वेस्ट इंडिज विरुध्द भारताने आपली दमदार आणि अविस्मरकारी विजय मिळवला आहे. आता भारतीय संघासमोर सेमीफायनल मध्ये इंग्लंडचे आव्हान असणार आहे. येणारा भारत-इंग्लंड सामना हा वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0