Parinay Fuke : राज्यात समान नागरी कायदा लागू करावा - आ. डॉ. परिणय फुके

19 Mar 2026 14:05:48
Parinay Fuke
 
मुंबई : (Parinay Fuke) विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, भाजप आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांनी विधानपरिषदेत राज्यात 'समान नागरी कायदा' लागू करण्याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली. यानिमित्ताने दै. मुंबई तरुण भारतने त्यांच्याशी साधलेला संवाद...(Parinay Fuke)
 
१) राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी तुम्ही विधानपरिषदेत केली. याबाबत काय सांगाल?
 
- भारताच्या संविधानाच्या कलम ४४ मध्ये सर्व राज्यातील नागरिकांना, सर्व धर्मियांना एकच कायदा असावा, असे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही हे लागू झाले पाहिजे. राज्यातील लग्न प्रथा, घटस्फोट, वारसा हक्क या सगळ्यासाठी सर्व धर्मांचा एकच कायदा असला पाहिजे. याबाबतची अनेक प्रकरणे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. राज्यातील सर्व भगिनींच्या संरक्षणासाठी समान नागरी कायदा असला पाहिजे.(Parinay Fuke)
 
२) विधानपरिषद सभापतींनी तुमच्या मागणीवर काय उत्तर दिले?
 
- आज माझी आणि माझे सहकारी वसंत खंडेलवाल यांची लक्षवेधी विधानपरिषदेत लागली होती. उपसभापतींनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य सरकारने यासंदर्भातील निवेदन करावे आणि पुढच्या अधिवेशनात कायदा आणावा, असे निर्देश त्यांनी दिले.(Parinay Fuke)
 
हेही वाचा : Ritu Tawde: मुंबईच्या विकासात महिलांचा मोलाचा वाटा! ‘सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्यात महापौर रितू तावडे यांचे प्रतिपादन
 
३) देशात प्रत्येक धर्माचा एक स्वतंत्र कायदा आहे. अशावेळी समान नागरी कायदा लागू झाल्यास काही लोकांकडून यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. यावर तुमचे काय मत आहे?
  
- हा देश कोणत्याही धर्मावर चालत नसून संविधानावर चालतो. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून सगळ्या धर्मांना सोबत घेऊन आणि महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करून समान नागरी कायद्याचे धोरण निश्चित केले पाहिजे, ही आमची भावना आहे.(Parinay Fuke)
 
४) विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये 'धर्म स्वातंत्र्य विधेयक' मंजूर झाले. याबद्दल काय सांगाल?
 
- परवा विधानसभेत आणि काल विधानपरिषदेत या कायद्यावर सविस्तर चर्चा झाली आणि एकमताने हा कायदा मंजूर करण्यात आला. मागच्या २० वर्षांपासून महाराष्ट्रात धर्मांतराची प्रकरणे वाढली आहेत. या कायद्यामुळे या प्रकरणांवर आळा येणार आणि आमिष किंवा बळजबरीने कुणालाही धर्मांतर करता येणार नाही.(Parinay Fuke)
 
५) राज्यात गॅसचा तुटवडा नाही, असे सरकार वारंवार सांगत आहे. मात्र, विरोधक सातत्याने यावरून सरकारला लक्ष करत आहेत.
 
- गॅसचा कुठलाही तुटवडा नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये लक्ष देऊन आहेत. राज्यात कुठेही गॅसचा काळा बाजार किंवा साठवणूक होऊ नये, याकडे राज्य सरकारचे लक्ष आहे. युद्ध सुरु असल्यामुळे गॅस किंवा पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतूकीत थोडीफार अडचण येत आहे. पण राज्यात गॅसचा कुठेही तुटवडा नाही.(Parinay Fuke)
 
Powered By Sangraha 9.0