मुंबई : (Ritu Tawde) मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे असून, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी दिलेला हातभार शहराच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. (Ritu Tawde)
महानगरपालिकेच्या कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र यांच्या वतीने आयोजित ‘सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार २०२६’ सोहळ्यात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात पार पडला. (Ritu Tawde)
महापौर तावडे म्हणाल्या की, आजच्या कार्यक्रमातील प्रत्येक महिला ही केवळ अधिकारी किंवा कर्मचारी नसून मुंबईसारख्या महानगराला पुढे नेणारी शक्ती आहे. घराबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलांसह गृहिणींचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असून त्यांचाही गौरव व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले. (Ritu Tawde)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या धैर्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रांत नेतृत्व करत आहेत. महिलांना कायदेशीर, वैद्यकीय व मानसिक आधार मिळावा यासाठी महापालिकेने सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र स्थापन केले असून अत्याचारग्रस्त महिलांसाठी विशेष वैद्यकीय कार्यप्रणालीही तयार करण्यात आली आहे. (Ritu Tawde)
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, प्रधान आयकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, पद्मश्री सन्मानित डॉ. अर्मिडा फर्नांडिस, उपआयुक्त चंदा जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Ritu Tawde)
प्रमुख पाहुण्या डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी महिलांमध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे सांगितले. महिला सशक्त, शिक्षित आणि सुरक्षित झाल्यास समाज प्रगत होईल, असे त्यांनी नमूद केले. डॉ. अश्विनी जोशी यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असून सवलती न मागता कामातून उत्तर द्यावे, असे आवाहन केले. तर डॉ. पल्लवी दराडे यांनी शिक्षण आणि सतत ज्ञान मिळवणे हे महिलांच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. (Ritu Tawde)
या कार्यक्रमात महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत महिला व पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच स्त्री मुक्तीवर आधारित पथनाट्य आणि पोवाड्याद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. (Ritu Tawde)