मुंबई : (Mumbai Mayor Sports Cup) डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मैदानी खेळ विसरली आहेत. अशा मुलांना मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा उत्तम संधी आहे. आजच्या युगातील मुलांचे भ्रमणध्वनी नव्हे तर मैदानी खेळांकडे लक्ष वळविण्यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा नक्कीच हातभार लावणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सन २०२६-२७ च्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले.(Mumbai Mayor Sports Cup)
महापौर चषक क्रीडा स्पर्धा (Mumbai Mayor Sports Cup) आयोजनाबाबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृहात संयुक्त सभेचे आज १८ मार्च, रोजी आयोजन केले होते.(Mumbai Mayor Sports Cup)
यावेळी उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, समाजवादी पक्षाच्या गटनेता अमरीन शहजाद अब्राहनी, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरसेवक धर्मेश गिरी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे आदींसह मुंबई शहर आणि उपनगरांतील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.(Mumbai Mayor Sports Cup)
हेही वाचा : Mumbai Metro Project: मेट्रो स्थानक परिसराचा खर्च महापालिका का करणार?
रितू तावडे म्हणाल्या, कोविड संसर्ग काळानंतर प्रथमच महापौर चषक क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहे. विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडलेल्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल. यासोबतच नवीन संघटनांनाही या स्पर्धांमध्ये वाव दिला जाईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना महानगरपालिकेचे क्रीडांगण सहजासहजी व कमी शुल्कात उपलब्ध करुन देण्याबाबतही विचार केला जाईल, अशा शब्दात त्यांनी उपस्थित संघटनांना आश्वस्त केले.(Mumbai Mayor Sports Cup)
तसेच स्पर्धेसाठी तयारी करण्याकरिता वेळ मिळावा, या क्रीडा संघटनांच्या मागणीचा विचार करता तीनऐवजी चार महिन्यांचा कालावधी देण्यात येईल, मैदानांबाबत काही अडचणी असतील तर त्या देखील सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. काही मैदानांवर शुल्क आकारले जात असेल तर त्या शुल्कातही सवलत देण्यात येईल. यासोबतच महापौर चषक क्रीडा स्पर्थेत स्थानिक नगरसेवकांनाही सामावून घेतल्यास स्पर्धा अधिक व्यापक प्रमाणात घेता येईल, असेही तावडे यांनी सांगितले.(Mumbai Mayor Sports Cup)