मुंबई : (PM Modi Emmanuel Macron Call) इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेले युद्ध आता आणखी गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे. लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता हे देश एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारत आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांशी संवाद साधत पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेतला.(PM Modi Emmanuel Macron Call)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पश्चिम आशियातील संघर्ष निवळण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीची तातडीने गरज दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या संवादाची माहिती दिली आहे. "पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स जवळून काम करत राहतील आणि समन्वय साधतील", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.(PM Modi Emmanuel Macron Call)
<!-- Inject Script Filtered -->
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "आज माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोललो. पश्चिम आशियात उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल आमच्या सामायिक चिंतांवर तसेच संवाद आणि राजनैतिकतेकडे परत येण्याच्या गरजेबद्दल आम्ही चर्चा केली. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी आम्ही जवळून काम करत राहू आणि समन्वय साधत राहू."(PM Modi Emmanuel Macron Call)
ओमानचे सुलतान आणि मलेशियाचे पंतप्रधानांशीही चर्चा
याचबरोबर पंतप्रधान मोदींनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली. या संभाषणांमध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती, शांतता पुनर्स्थापना व होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतूक यांवर भर देण्यात आला.
(PM Modi Emmanuel Macron Call)