नागपूर : (CM Devendra Fadnavis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने दिल्या.
श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि नववर्ष अभिनंदन समारोह समितीच्या वतीने नागपूर येथील लक्ष्मीनगर चौकात नववर्षदिनाच्या निमित्ताने शोभायात्रा आणि रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.(CM Devendra Fadnavis)
हेही वाचा : PM Modi Emmanuel Macron Call: आखातात युद्धाचा भडका उडालेला असताना पंतप्रधान मोदींचा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद! काय चर्चा झाली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून आपण सारे आपल्या नूतन संकल्पांची सुरुवात करतो आणि आपल्या जीवनाला सामोरे जातो. ही गुढी भारताची गुढी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही गुढी उंचच उंच जात राहो," अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.(CM Devendra Fadnavis)
आधुनिकता जवळ करतानाच संस्कृतीचे जतन करावे
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "विकास भी, और विरासत भी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगतात. ही विरासत म्हणजे आपली संस्कृती आहे. त्यामुळे आधुनिकता जवळ करतानाच आपली संस्कृती जतन करून ठेवायची आहे. नववर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राला पुढे नेणे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक करणे, हा एकच संकल्प आहे."(CM Devendra Fadnavis)