मुंबई : (Kokan-Hearted Girl) ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने मुंबईजवळील पनवेलमध्ये स्वतःचं नवं घर खरेदी केलं आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत तिच्या प्रवासाची भावनिक कहाणी सांगितली आहे.
अंकिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “घर घेणं हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती.” मुंबईत सुरुवातीला ती सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होती, पण तिच्या मनात सतत एकच प्रश्न असायचा की, माझं घर कधी होणार?
हेही वाचा : dhurandhar 2: दाऊद इब्राहिमची भूमिका कोणी साकारली? नाव ऐकून व्हाल थक्क...
अँटिलिया पासून स्वतःच्या घरापर्यंतचा प्रवास
अंकिता अनेकदा पेडर रोडवर जाऊन अँटिलिया समोर उभी राहायची आणि “एक दिन मेरा भी घर होगा” अशी स्टोरी टाकायची. आज योगायोगाने ज्या टॉवरमध्ये तिचं घर आहे, त्याचं नावही “अँटिलिया” असल्याने हा क्षण तिच्यासाठी आणखी खास ठरला.
लग्नानंतर तिचं हे घर घेण्याचे स्वप्न तिच्या पती कुणालचं झालं. तिने पोस्टमध्ये पुढे असेही लिहीले की वर्षभर घर शोधल्यानंतर अखेर एक घर पाहताच मनाने “हेच!” असं सांगितलं. तिने पोस्टमध्ये हेही लिहीले आहे की, छोटं असेल, पण आमचं आहे. अंकिता म्हणते, अभिमान पैशांचा नाही, तर त्या प्रवासाचा आहे. जिद्द, धैर्य आणि स्वप्नांवर विश्वास ठेवला तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, हा संदेश तिने तिच्या चाहत्यांना या पोस्टमार्फत दिला आहे. अंकिताच्या या यशामुळे सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अनेकांनी तिच्या जिद्दीचं कौतुकही केलं आहे.