Iran-Israel War : आखात पेटलं! इराणचा जगातील सर्वात मोठ्या 'एलएनजी' प्रकल्पावर हल्ला

19 Mar 2026 14:34:35

Iran-Israel War

मुंबई : (
Iran-Israel War) मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून बुधवारी इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने गुरुवारी पहाटे कतारमधील जगातील सर्वात मोठ्या एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) निर्यात प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात कतारच्या संकुलाचे मोठे नुकसान झाले आहे. इराणने एकूण पाच क्षेपणास्त्रे डागली त्यापैकी चार निरस्त करण्यात यश आले पण एक क्षेपणास्त्र रास लाफान या एलएनजी प्रकल्पावर कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Iran-Israel War)

रास लाफानवर हल्ला

गुरुवारी पहाटे रास लाफानवर झालेल्या हल्ल्यामुळे आग लागली, कतारचे प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, वारंवार होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरुवातीला जगात एलएनजी पुरवठ्याचा सुमारे पाचवा भाग असलेल्या प्रकल्पात उत्पादन थांबण्यात आले होते. हबशान येथील गॅस सुविधांचे नुकसान झाल्याने अबू धाबी प्रशासनाने ते बंद केले होते, अशी माहिती समोर आली आहे. (Iran-Israel War)

पार्सवर हल्ल्यानंतर इराण इरेला पेटला

इसायने इराणच्या महाकाय दक्षिण पार्स गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर संतापलेल्या इराणने देखील प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिला होता. कतार, संयुक्त अरब आणि सौदी त्यांच्या पुढील लक्ष्य असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. गेल्या काही दिवसांपासून या आखाती भागातील तेल आणि गॅस सुविधांवर हल्ले केले जात आहेत. यामुळे जगभरात तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल आहे शिवाय त्यांचा भाव देखील गगनाला भिडले आहेत. (Iran-Israel War)


Powered By Sangraha 9.0