मुंबई : (Draupadi Murmu) देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी अयोध्येला भेट देत श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजा-अर्चना केली आणि रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या राम दरबारात श्रीराम यंत्राची स्थापना केली. त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत रामलल्लाच्या आरतीत सहभागी होत देशवासियांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.(Draupadi Murmu)
याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाल्या, "राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिरावर ध्वजारोहण हे आपल्या इतिहासातील सुवर्णक्षण आहेत. मला श्रीराम यंत्राची स्थापना करण्याची संधी मिळाली, ही प्रभू श्रीरामांची माझ्यावर असलेली कृपा आहे." रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राष्ट्रपतींचा हा दुसरा अयोध्या दौरा आहे. यापूर्वी त्या १ मे २०२४ रोजी येथे आल्या होत्या, तेव्हा त्यांनी हनुमानगढी आणि राम मंदिरात पूजा-अर्चना केली होती.(Draupadi Murmu)
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : भारताची गुढी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात उंचच उंच जात राहो
कसे आहे श्रीराम यंत्र?
राम दरबारात स्थापित करण्यात आलेले श्रीराम यंत्र विशेषतः तामिळनाडूतील कांचीपुरम येथील मठात तयार करण्यात आले होते. तेथून ते आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे आणले गेले आणि त्यानंतर रथयात्रेद्वारे सुमारे १० दिवसांपूर्वी अयोध्येत पोहोचवण्यात आले. सुमारे १५० किलो वजनाच्या या यंत्रावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. अयोध्येतील ज्योतिषाचार्य रघुनाथ दास शास्त्री यांच्या मते, हे यंत्र एक विशेष वैदिक भूमितीय रचना आहे, ज्यामध्ये मंत्र आणि आकृत्यांच्या माध्यमातून भगवान श्रीराम तसेच इतर देवतांची दिव्य ऊर्जा स्थापित मानली जाते.(Draupadi Murmu)