US-Israel-Iran War : अमेरिकेचा पराभव अटळ? रॉ च्या माजी प्रमुखाचा मोठा दावा! म्हणाले, "इराण युद्ध जिंकणार आणि भारत..."

19 Mar 2026 19:28:40
Former RAW Chief on US-Israel-Iran War
 
मुंबई : (Former RAW Chief on US-Israel-Iran War) इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेले युद्ध आता आणखी गंभीर वळणावर पोहोचले आहे. लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता हे देश एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी मोठे विधान केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी इराण आणि भारत यांच्यात फार जुने आणि मजबूत नाते असल्याचे म्हटले आहे. (Former RAW Chief on US-Israel-Iran War)

काय म्हणाले माजी रॉ प्रमुख?
 
अमरजीत सिंग दुलत यांनी सांगितलं की, "आपले इराणशी फान जुने संबंध आहेत. इराण आणि भारताचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. इराण नेहमीच आपल्यासोबत राहिला आहे, त्यामुळे आपण इराणच्या बाजूने राहिलं पाहिजे". सध्याच्या स्थितीत अमेरिका आणि इस्रायलसह सुरु असलेल्या संघर्षात इराणचा विजय होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम दुर्दैवी असल्याचा उल्लेख केला. जे काही होत आहे ते चिंताजनक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी विधान अशावेळी केलं आहे जेव्हा मध्यपूर्वेत वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याचा धोका आहे. ज्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होऊ शकतो. (Former RAW Chief on US-Israel-Iran War)

भारत आणि इराणचे नाते

भारताच्या स्वातंत्र्यानंतर, भारत आणि इराण यांच्यातील संबंध हळूहळू दृढ झाले. दोन्ही राष्ट्रांनी औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि कालांतराने आपल्या सहकार्याचा विस्तार केला. १९५० ते १९७० या कालावधीत, इराणचा कल अमेरिकेकडे अधिक होता. पण या स्थितीतही त्यांनी भारताशी आपले संबंध कायम ठेवले होते. हा कालखंड दोन्ही देशांमधील समतोल आणि परस्पर सामंजस्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरला. (Former RAW Chief on US-Israel-Iran War)

१९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडून आली, ज्यामुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल झाला. त्यानंतरच्या काळातही, भारताने एक समतोल दृष्टिकोन स्वीकारला. एकीकडे इराणशी असलेले संबंध कायम राखले, तर दुसरीकडे पाश्चात्य राष्ट्रांशी संबंध वृद्धिंगत करणे सुरूच ठेवले. आधुनिक काळात, भारत आणि इराण यांच्यातील संबंध अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अधिकच दृढ झाले आहेत. ऊर्जा क्षेत्रात, इराण हा ऐतिहासिकदृष्ट्या भारतासाठी तेलाचा एक प्रमुख पुरवठादार राहिला आहे; भारताने आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत इराणवर अवलंबून राहणे पसंत केले आहे. (Former RAW Chief on US-Israel-Iran War)

चाबहार बंदराचे महत्त्व

याशिवाय, चाबहार बंदर हे दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या बंदराच्या विकासात भारत सक्रियपणे साहाय्य करत आहे. यामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध होतो, ज्यामुळे पाकिस्तानला वगळून प्रवास करणे शक्य होते. 'आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिका' (INSTC) ही देखील व्यापार आणि संपर्क-सुविधेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत, इराण आणि रशिया यांना जोडतो, ज्यामुळे व्यापारी व्यवहारांचे कामकाज अधिक सुलभ होते. (Former RAW Chief on US-Israel-Iran War)
Powered By Sangraha 9.0