Eknath Shinde : “देवीच्या चरणी माणुसकीचा नैवेद्य…

19 Mar 2026 17:10:15
Eknath Shinde
 
ठाणे : (Eknath Shinde) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणा, माणुसकी आणि दिलदार स्वभावाची प्रचिती ठाणेकरांना दिली. ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाच्या देवी स्वागत मिरवणुकीत त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता हा संपूर्ण सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला.(Eknath Shinde)
 
दरवर्षी त्यांच्या पुढाकारातून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात यंदाही भव्यता आणि भक्तिभावाची उधळण पाहायला मिळाली. ढोल-ताशांचा निनाद, “जय देवी”च्या घोषणा आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक उत्साहात पार पडत होती. शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते.(Eknath Shinde)
 
मात्र, या भव्यतेतही शिंदे यांनी माणुसकीची एक साधी पण मनाला भिडणारी कृती करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षीप्रमाणे तंदूर वडापावच्या स्टॉलवर थांबण्याची परंपरा कायम ठेवत तेथे पोहोचलेल्या शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी स्वतः वडापाव खाणे टाळले. त्याऐवजी त्यांनी मिरवणुकीत कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांना स्वतःहून वडापाव खाऊ घातला.(Eknath Shinde)
 
कडक उन्हात, तासन्‌तास उभे राहून सेवा देणाऱ्या या पोलिस भगिनींप्रती दाखवलेली ही आपुलकी आणि आदर पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले. ही केवळ एक छोटीशी कृती नव्हती, तर त्यांच्या कर्तव्याला दिलेला सन्मान होता.(Eknath Shinde)
 
हेही वाचा : Sustainable Development: 'महाराष्ट्र भविष्य कल्याण' विधेयकासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आश्वासन 
 
इतकंच नव्हे, तर “शिंदे काका” म्हणत सेल्फीसाठी धाव घेतलेल्या लहान मुलांनाही त्यांनी तितक्याच प्रेमाने वडापाव खाऊ घातला. त्यांच्या या आपुलकीमुळे बच्चेकंपनी आनंदून गेली आणि काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात निरागस आनंदाची लहर पसरली.(Eknath Shinde)
 
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा साधेपणा आणि माणुसकीचा स्पर्श पुन्हा एकदा ठाणेकरांच्या मनात घर करून गेला. चैत्र नवरात्रोत्सवाच्या या मंगल प्रसंगी भक्तीबरोबरच माणुसकीचीही सुंदर अनुभूती देणारा हा क्षण… सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
 
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, हनुमंत जगदाळे, योगेश जानकर शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच विभागप्रमुख अमित जयस्वाल, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश कोटवानी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Eknath Shinde)
 
Powered By Sangraha 9.0