dhurandhar 2: दाऊद इब्राहिमची भूमिका कोणी साकारली? नाव ऐकून व्हाल थक्क...

19 Mar 2026 19:02:03
Dhurandhar 2
 
मुंबई : (Dhurandhar 2) बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंदर २' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंगच्या म्हणजेच हमजा अली माजारीच्या डायरीमध्ये 'बडे साहब' या नावाचा उल्लेख झाला होता. संजय दत्तच्या एन्ट्री सीनमध्येही या नावाचा उल्लेख झाला होता. त्यामुळे 'बडे साहब' म्हणजेच मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमची भूमिका नक्की कोण साकारणार याकडे प्रेक्षकांच लक्ष लागलं होत. आता 'धुरंदर २' मध्ये याचे उत्तर प्रेक्षकांना मिळाले आहे.
 
'धुरंदर २' मध्ये 'बडे साहब' म्हणजेच दाऊद इब्राहिमची भूमिका नँशनल अवाँर्ड विजेता दानिश इकबालने साकारली आहे. पहिल्या भागात रणवीर सिंगच्या म्हणजेच हमजा अली माजारीचा पुढचा टार्गेट 'बडे साहब' दाखवण्यात आले होते. दानिश इकबालने यापूर्वीही अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'महाराणी २' या वेबसीरिजमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली. ‘धुरंदर २’मधील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
 
हेही वाचा : धुरंदर २ रिलीज होण्यापुर्वी दिग्दर्शक आदित्य धरने केली पोस्ट शेअर; कॅप्शनमध्ये प्रेक्षकांना दिली मोठी हिंट...
 
'धुरंदर २' या चित्रपटाचा प्रीमीयर १८ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. यावेळी फक्त प्रीमीयर शोमधून चित्रपटाने तब्बल ४३ कोटींची कमाई केली असुन आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0