मुंबई : (Sewri Family Clash News) गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शिवडीतील कोळसाबंदर परिसरात लहान मुलांमधील किरकोळ वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन मारहाणीची गंभीर घटना घडली. या प्रकरणात धर्मांध मुस्लिमांनी हिंदू कुटुंबीयांवर लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याने दोन महिलांना डोक्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे. सदर प्रकरणी शिवडी पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली असून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Sewri Family Clash News)
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार ही घटना दि. १८ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कोळसाबंदर येथील रवी मोटार गॅरेज परिसरात घडली. लहान मुली एकमेकांना चिडवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला वाद हळूहळू वाढत जाऊन मोठ्या भांडणात परिवर्तित झाला. तक्रारीनुसार त्यावेळी उपस्थित लहान मुलांनी पाण्याचे रिकामे डबे, प्लायवुड उचलून फेकण्यास सुरूवात केली. त्यावरून वाद वाढत जावून मोठ्या लोकांमध्ये हातापायी सुरू झाली. त्यावेळी रिजायाने सलोनी व रेणूचे केस ओढले व त्यांना जमीनीवर पाडले. त्यामुळे तक्रारदार महिला, तिची पुतणी खुशी त्यांना सोडवण्यास गेल्या असता त्यांना देखील सबीना व सना यांच्याकडून मारहाण झाली.(Sewri Family Clash News)
हेही वाचा : North Korea Elections : मतदान न करणारे ०.०७ टक्के नागरिक कोण? उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन घेणार शोध?
अशी माहिती आहे की, रिजायाचा नवरा अक्रम याने लाकडी बांबूने पाठीमागून तक्रारदार महिलेच्या डोक्यात मारले म्हणून गंभीर दुखापत झाली आणि डोक्यातून रक्तस्त्राव झाला. त्याचवेळी सबीनाचा भाऊ छोटू हा तेथे आला तो देखील लोखंडी रॉड घेवून मारू लागला. रझीयांचा दीर शहारूख व अली तेथे आले आणि ते देखील हाताने मारहाण करू लागले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपत्कालीन क्रमांक १०० वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी महिलांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.(Sewri Family Clash News)
या प्रकरणी रिजाया, अक्रम, सना, शाहरूख, सबीना, अजगर अली आणि छोटू यांच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ११५(२), ३५२, ११८(१), १८९(२), १९०, १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.(Sewri Family Clash News)
हा प्रकार नव्याने घडलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न याठिकाणी होतोय. १२ वर्षांची मुलगी असो किंवा तरुण-तरुणी कोणीही, संधी मिळताच धर्मांधांकडून आम्हाला सतत त्रास दिला जातो. या परिसरात एक-दोनच हिंदू कुटुंब आहेत, त्यामुळे आम्ही ही जागा सोडून जावी, यासाठी हे लोक त्रास देतायत. पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळावे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा!(Sewri Family Clash News)
- रेणू सिंग, स्थानिक