गैर-हिंदूंना विना‘अ‍ॅफिडेविट’ केदारनाथला बंदी, सारा अली खान चर्चेत

18 Mar 2026 16:12:01

मुंबई : 2026 सालची चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होत असतानाच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले केदारनाथ मंदिर (Kedarnath Temple) आणि बद्रिनाथ मंदिर (Badrinath Temple) येथे दर्शनासाठी जाणाऱ्या गैर-हिंदूंना आता अ‍ॅफिडेविट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशभरात चर्चेला उधाण आले असून अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्वीवेदी (Hemant Dwivedi) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ज्या गैर-हिंदूंना सनातन धर्मावर श्रद्धा आहे आणि ते लेखी स्वरूपात याची पुष्टी करतात, त्यांचे स्वागत आहे.”

सारा अली खानलाही अ‍ॅफिडेविट द्यावे लागेल का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केलं की, “जर त्या सनातन धर्मावर श्रद्धा असल्याचे अ‍ॅफिडेविट देत असतील, तर त्यांना दर्शनाची परवानगी दिली जाईल.”







View this post on Instagram
















A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)


दरम्यान, या नव्या नियमावर सध्या साराने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिचं 2025 मधील एक वक्तव्य पुन्हा व्हायरल होत आहे. त्या वेळी तिने स्पष्ट केलं होतं की, “आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. धर्माच्या सीमा या माणसांनी निर्माण केल्या आहेत. केदारनाथला जाणं ही माझी वैयक्तिक श्रद्धा आहे, याच्याशी इतरांचा काहीही संबंध नाही.” तिने ‘टाइम्स नाऊ समिट’मध्ये आपल्या ओळखीबाबत बोलताना, “मी भारतीय आहे, हीच माझी खरी ओळख आहे,” असंही ठामपणे सांगितलं होतं.

विशेष म्हणजे, सारा अली खान (Sara Ali Khan) दरवर्षी केदारनाथ धामला भेट देते. केदारनाथ ‘Kedarnath’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती दोन महिने तिथे राहिली होती. इतकंच नव्हे, तर एकदा ती बर्फवृष्टीतही दर्शनासाठी पोहोचली होती. या नव्या नियमामुळे आगामी चारधाम यात्रेत काय बदल होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Powered By Sangraha 9.0