Hormuz Strait oil tanker: भारताचे तिसरे तेलवाहू जहाज ‘जग लाडकी’ अखेर भारतात दाखल! इंधन संकट टळणार?

18 Mar 2026 13:18:47
 
Hormuz Strait oil tanker
 
मुंबई: (Hormuz Strait oil tanker) मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जग लाडकी हे भारतीय ध्वजाखालील तेलवाहू जहाज सुरक्षितपणे गुजरातमधील मुंद्रा बंदर येथे दाखल झाले आहे. (Hormuz Strait oil tanker)
 
हे जहाज फुजैराह बंदर येथून १४ मार्च दरम्यान रवाना झाले होते आणि १८ मार्च रोजी भारतात पोहोचले. काही अहवालांनुसार जहाज दुपारी २:३० वाजता पोहोचण्याची अपेक्षा होती, मात्र ते सकाळी ६ वाजताच मुंद्रा बंदरात दाखल झाले. (Hormuz Strait oil tanker)
 
हेही वाचा: Fuel Crisis: मध्यपूर्वेतील युद्धाचा एलपीजीनंतर आता पाईपलाइनद्वारे घरात येणाऱ्या गॅस पुरवठ्यावरही परिणाम होईल का?
 
या जहाजामध्ये तब्बल ८०,८०० मेट्रिक टन ‘मुरबान’ प्रकारचे कच्चे तेल आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडताना धोका निर्माण झाला होता. विशेषतः इराण आणि यूएई यांच्यातील तणावामुळे या मार्गावरील जहाजवाहतुकीवर दबाव होता. तरीही जहाज आणि त्यावरील भारतीय नाविक सुरक्षित भारतात पोहोचले आहेत. (Hormuz Strait oil tanker)
 
हे जहाज शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे असून ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ नंतर भारतात दाखल होणारे तिसरे महत्त्वाचे जहाज ठरले आहे. या कच्च्या तेलाच्या आगमनामुळे भारतातील इंधन पुरवठा स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे. सध्या देशातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Hormuz Strait oil tanker)
 
 
Powered By Sangraha 9.0