नवी दिल्ली: (Delhi fire accident) राजधानी नवी दिल्ली मध्ये बुधवारी, १८ मार्च रोजी सकाळी पालम मेट्रो स्टेशन जवळील सदनगर परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही आग सकाळी सुमारे ६:३० वाजता लागली. (Delhi fire accident)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या खालच्या मजल्यावर कपडे आणि कॉस्मेटिक्सची दुकाने होती, तर वरच्या मजल्यावर एकाच कुटुंबातील ९ ते १५ सदस्य राहत होते. आगीमध्ये ७ जण जिवंत जळून मृत्यूमुखी पडले असून, त्यात ३ लहान मुलींचा समावेश आहे. (Delhi fire accident)
दरम्यान, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग इतकी भीषण होती की अनेक जण अडकले होते. काहींनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारल्याची माहिती समोर येत आहे. तर काहींना भिंत तोडून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सुमारे ३० अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने भिंती तोडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. (Delhi fire accident)
या दुर्घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीचे उपराज्यपाल तारनजित सिंह संधू यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Delhi fire accident)