Sarke Chunar Controversy : नोरा फतेहीच्या 'सरके चुनर' गाण्यावर बंदी! मंत्री अश्विनी वैष्णव यांचे स्पष्टीकरण, म्हणाले,"अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे..."

18 Mar 2026 16:18:29

Sarke Chunar Controversy


 
मुंबई : (Sarke Chunar Controversy) बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि अभिनेता संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या 'सरके चुनर' या नवीन गाण्यावरून निर्माण झालेला वाद आता थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत या वादग्रस्त बॉलिवूड गाण्यावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समाज आणि संस्कृतीचा आदर करणाऱ्या उचित निर्बंधांच्या मर्यादेतच असले पाहिजे, असे वैष्णव यांनी यावेळी नमूद केले.(Sarke Chunar Controversy)
 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमर्याद असू शकत नाही


समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदोरिया यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. या वादग्रस्त गाण्याबाबत लोकसभेत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, "गाण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छित आहे की, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भारताच्या संविधान निर्मात्यांनी जे रास्त निर्बंध (reasonable restrictions) लावले आहेत, त्यानुसारच चालले पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमर्याद असू शकत नाही, ते समाज आणि संस्कृतीच्या संदर्भातच असायला हवे."(Sarke Chunar Controversy)




पुढे बोलताना वैष्णव म्हणाले की, "डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यामातून ज्या पद्धतीने गोष्टी आज वेगाने पसरतात, त्यामध्ये समाजाच्या सुरक्षेसाठी विशेषतः मुले, महिला आणि समाजातील वंचित घटकांच्या सुरक्षिततेसाठी जी काही कठोर पावले उचलली पाहिजेत, ती उचलण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे."(Sarke Chunar Controversy)


कंगना रणौत यांची प्रतिक्रिया


अभिनेत्री नोरा फतेहीच्या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात, भाजप खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, अश्लीलता आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात बॉलिवूडने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्या म्हणाल्या की, देशभरातून टीका होत असतानाही, त्यांना कोणतीही शरम वाटत नाही. बॉलिवूडमध्ये अशा आशयावर अधिक कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.(Sarke Chunar Controversy)
Powered By Sangraha 9.0