धुरंदर २ रिलीज होण्यापुर्वी दिग्दर्शक आदित्य धरने केली पोस्ट शेअर; कॅप्शनमध्ये प्रेक्षकांना दिली मोठी हिंट...

18 Mar 2026 18:30:57
Dhurandhar 2
 
मुंबई : (Dhurandhar 2) 'धुरंधर : द रिव्हेंज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीजच्या काही तास आधीच दिग्दर्शक आदित्य धरने एक पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग बाँक्स आँफिसवर तुफान हिट झाला होता. त्याने भारतात ८३६.९५ कोटींची कमाई केली होती. आदित्य धरने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत प्रेक्षकांचे आभार मानले असुन त्यांना एक विनंतीही केली आहे.
 
 या पोस्टमध्ये आदित्य धर म्हणाले आहे की, ५ डिसेंबर २०२५ रोजी धुरंधर प्रदर्शित झाला तेव्हापासुन या चित्रपटावर तुम्ही प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव केला. प्रत्येक सीनवर चर्चा केली, चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला आणि अशा गोष्टींचं निरीक्षण केलं, ज्या कोणाच्या लक्षात येतील याचा मी विचारच केला नव्हता. या प्रवासात आमचा हा चित्रपट तुमचा झाला. त्यानंतर देशाचा आणि जगाचा झाला. एखादया दिग्दर्शकासाठी ही खूप सुंदर भेट आहे. आता 'धुरंधर : द रिव्हेंज' हा दुसरा भाग बनवताना आम्हांला प्रेक्षकांना सरप्राइज द्यायचं आहे.
 
हेही वाचा : गैर-हिंदूंना विना‘अ‍ॅफिडेविट’ केदारनाथला बंदी, सारा अली खान चर्चेत
 
त्यांनी पुढे प्रेक्षकांना स्पॉइलर्स शेअर न करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, आम्ही या चित्रपटात आमचे सर्वस्व ओतले आहे त्यामुळे थिएटरला जाऊन चित्रपट अनुभवला पाहिजे. त्यांनी पोस्टखाली कॅप्शनमध्ये लिहिले की, श्रेयनामावली पूर्णपणे स्क्रोल होईपर्यंत खुर्ची सोडून जाऊ नका या वाक्यामुळे आता तिसरा भागाची घोषणा होईल का याची  चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0