मुंबई: (Kabul airstrike 2026) अफगाणिस्तानमधील काबूल येथील ‘ओमिद’ नशामुक्ती उपचार केंद्रावर सोमवारी, १६ मार्च रोजी रात्री पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाला असून, भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याचा स्पष्ट निषेध केला आहे. अफगाण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य व्यसनमुक्ती उपचार घेत असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. (Kabul airstrike 2026)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान मधील सत्ताधारी तालिबान प्रशासनाने या हल्ल्यासाठी थेट पाकिस्तान ला जबाबदार धरले आहे. तसेच, या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशाराही दिला आहे. मात्र, पाकिस्तानने या आरोपांचे खंडन करताना सांगितले की, त्यांनी कोणत्याही रुग्णालयावर हल्ला केलेला नाही. त्यांच्या मते, ही कारवाई “दहशतवादी तळ आणि समर्थन संरचना” लक्ष्य करून करण्यात आली होती. (Kabul airstrike 2026)
दरम्यान, भारत ने या घटनेचा “स्पष्टपणे” निषेध करत, याला “भ्याड आणि अमानवीय हिंसक कृत्य” असे संबोधले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले की, हा हल्ला अशा ठिकाणी करण्यात आला जिथे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, आणि अशा कारवाईला कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता येणार नाही. शिवाय पाकिस्तान या घटनेला लष्करी कारवाईचे रूप देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. (Kabul airstrike 2026)
भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला या घटनेची दखल घेण्याचे आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अफगाणिस्तानमधील नागरिकांवर होणारे अशा प्रकारचे हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणीही केली आहे. सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्यात दोन इस्लामी देशांमधील हा वाढता संघर्ष चिंताजनक मानला जात आहे. या घटनेमुळे दक्षिण आशियातील सुरक्षेची परिस्थिती अधिक अस्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Kabul airstrike 2026)