दिल्ली: (Honey Singh Concert Fight) लोकप्रिय रॅपर यो यो हनी सिंग याचा ‘'माय चॅप्टर - इंडिया टूर'’ मोठ्या उत्साहात सुरू झाला. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या या भव्य कॉन्सर्टला हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी अचानक झालेल्या गोंधळामुळे या कॉन्सर्टला गालबोट लागले. (Honey Singh Concert Fight)
१४ मार्चच्या रात्री झालेल्या या कार्यक्रमात हनी सिंहने मंचावर येताच 'देसी कलाकार', 'ब्राउन रंग', 'ब्लू आईज' आणि 'लुंगी डान्स' यांसारखी त्याची सुपरहिट गाणी सादर केली. या गाण्यांवर संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षक जल्लोषात थिरकत होते. कॉन्सर्ट रंगात आला असतानाच प्रेक्षकांमधील एका गटाचा कार्यक्रमाच्या स्पॉन्सर टीममधील काही लोकांशी वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता, मात्र काही मिनिटांतच त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. (Honey Singh Concert Fight)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्यामुळे काही वेळासाठी स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Honey Singh Concert Fight)
यापूर्वीही झाला होता वाद...
दरम्यान, यो यो हनी सिंग यापूर्वीही एका कार्यक्रमातील वक्तव्यामुळे वादात सापडला होता. जानेवारी महिन्यात दिल्लीतील एका संगीत कार्यक्रमादरम्यान त्याने अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची लाट उसळली होती. (Honey Singh Concert Fight)
या वादानंतर हनी सिंहने जाहीरपणे माफी मागत म्हटले होते की, “माझ्या शब्दांमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्याबद्दल मी माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.” तसेच, भविष्यात आपल्या शब्दांवर अधिक संयम राखण्याचा आणि विचारपूर्वक बोलण्याचा संकल्पही त्यानं केलेला. (Honey Singh Concert Fight)