आयआयटी पवईमधून १० फुटांच्या मगरीची सुटका

16 Mar 2026 20:24:39
 crocodile
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पवईतील आयआयटीच्या कॅम्पसमधून सोमवार दि. १६ मार्च रोजी वन विभागाने १० फूट लांबीच्या मगरीला रेस्क्यू केले (crocodile). राॅ या वन्यजीव बचाव संस्थेने मगरीला पकडण्यासाठी वन विभागाची मदत केली. आयआयटीच्या शेजारीच असलेल्या विहार तलावामधून ही मगर कॅम्पसमध्ये शिरल्याची शक्यता आहे. (crocodile)
 
 
आयआयटी पवईच्या कॅम्पसमध्ये एक अजस्त्र मगर फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. कॅम्पसला लागूनच असलेल्या विहार तलावामध्ये मगरींचा अधिवास आहे. या तलावामधूनच मगर कॅम्पसमध्ये शिरली होती. सुरक्षा रक्षकाला मगरी दिसल्यानंतर त्याने तातडीने याची माहिती वन विभागाला दिली. सोमवारी पहाटे राॅ या वन्यजीव बचाव संस्थेचे कार्यकर्ते आणि मुंबई वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी १० फुटांच्या मगरीला सुखरुपरित्या पकडले. ही मगर मार्श क्रोकोडाईल या प्रकारमधील होती. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीअंतर्गत ठेवण्यात आले आहे. पशुवैद्यकांनी ही मगर सोडण्याकरिता सुदृढ असल्याचे निर्देश दिल्यानंतरच तिला नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0