Pandit Bhimsen Joshi Hospital: व्हेंटिलेटरवरील ८९ वर्षीय महिलेचा उंदराने घेतला चावा, ; भाईंदरच्या रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड

16 Mar 2026 19:18:10

मुंबई : (Pandit Bhimsen Joshi Hospital) रुग्णालयातील हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार भाईंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे समोर आला आहे. अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय जिवंत महिलेच्या हाताला उंदराने चावा घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. (Pandit Bhimsen Joshi Hospital)

मिळालेल्या माहितीनुसार, सुहासिनी माठेकर (वय ८९) यांना १२ मार्च रोजी प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत. मात्र, शनिवारी रात्रीच्या सुमारास आयसीयू मध्येच उंदराने त्यांच्या हाताल्याचा प्रकार घडला. रविवारी सकाळी सुमारे ६ वाजता नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या हाताजवळ उंदीर दिसला. (Pandit Bhimsen Joshi Hospital)

या घटनेमुळे रुग्णालयाच्या स्वच्छता व सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयसीयूसारख्या अतिसंवेदनशील विभागात सामान्य नागरिकांना प्रवेश नसताना उंदरांचा वावर कसा काय झाला, असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे रात्री ड्युटीवर असलेल्या डॉक्टर किंवा नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सकाळी नातेवाईकांनी पाहिल्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (Pandit Bhimsen Joshi Hospital)

Powered By Sangraha 9.0