Suraj Chavan viral video: ‘माझी नक्कल केली पण...!’ झी चित्र गौरववर सुरज चव्हाणची नाराजी; व्हिडिओत व्यक्त केली खंत

15 Mar 2026 15:32:23
 
Suraj Chavan viral video
 
मुंबई : (Suraj Chavan viral video) मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा झी चित्र गौरव पुरस्कार अलीकडेच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक उपस्थित होते. विविध कलाकारांनी रंगतदार परफॉर्मन्स आणि विनोदी स्किट्स सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. (Suraj Chavan viral video)
 
मात्र या कार्यक्रमानंतर बिग बॉस मराठी च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आला आहे. कार्यक्रमात त्याची नक्कल करत त्याचे लोकप्रिय डायलॉग ‘झापुक झुपुक’ आणि ‘बुक्कीत टेंगूळ’ सादर करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओनंतर आता सुरज चव्हाणने एक व्हिडिओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सादरीकरण आवडलं पण झी मराठीने मला कार्यक्रमाला बोलावलं नाही असं म्हणत त्याने खंत बोलून दाखवली. (Suraj Chavan viral video)
 
सूरज चव्हाण नेमकं काय म्हणाला? (Suraj Chavan viral video)
 
सूरज म्हणाला, “नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण बोलतोय. काही कारणामुळे आज मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण माझं मन खूप दुखावलं आहे. अलीकडे झी मराठीवर ‘झी चित्र गौरव’ हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात माझी अॅक्टिंग पाहून मला आनंद झाला. पण एक गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. एवढा मोठा शो असताना त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. ते खूप मोठे लोक आहेत, हे मला मान्य आहे. पण किमान त्या कार्यक्रमाच्या एखाद्या कोपऱ्यात जरी मला बसवलं असतं, तरी मला बरं वाटलं असतं की मला बोलावलं आहे. त्यांच्या कडून कुठलाही कॉल आला नाही, निमंत्रणही दिलं नाही. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. माझं मन किती दुखावलं आहे, हे फक्त मला माहीत आहे. (Suraj Chavan viral video)
 
फॅन लोकांनो, मी तुम्हाला देव मानतो. तुमच्यामुळेच मी आज मोठा स्टार झालो आहे. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं आहे. लोकांना ‘सूरज चव्हाण’चं कॅरेक्टर खूप आवडलं आहे. माझे फॅन्स पोट धरून हसतात, याचा मला खूप अभिमान आहे. पण एवढीच एक खंत आहे की त्या कार्यक्रमात कुठेतरी एका बाजूला तरी मी असायला हवा होतो. एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी काही नाही.” (Suraj Chavan viral video)
 
तो पुढे म्हणाला, “माझ्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगा, त्यांनी मला तिथे बोलवायला पाहिजे होतं की नाही? खरं खरं सांगा, माझ्या फॅन लोकांनो. तुम्ही माझ्यासाठी देव आहात. मी तुम्हाला मनापासून जपतो. तुमच्यासाठी तरी त्यांनी मला बोलवायला हवं होतं की नाही?” असा सवालही त्याने केला. (Suraj Chavan viral video)
 
 
Powered By Sangraha 9.0