मुंबई : (LPG Cylinder Shortage) वाढत्या जागतिक तणाव आणि इंधन पुरवठ्यातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती गॅसबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शनिवारी, १४ मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या ग्राहकांकडे पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलेंडर ठेवता किंवा रिफिल घेता येणार नाही. (LPG Cylinder Shortage)
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ज्यांच्याकडे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन आहेत त्यांनी एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे. तसेच सार्वजनिक तेल कंपन्या किंवा त्यांच्या वितरकांकडून सिलेंडर रिफिल घेण्यावरही बंदी असेल. हा निर्णय एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेशात सुधारणा करून लागू करण्यात आला आहे. (LPG Cylinder Shortage)
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम...
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने पीएनजी वापरणाऱ्या घरांना एलपीजी पुरवठा टाळण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून उपलब्ध एलपीजी इतर ग्राहकांसाठी राखून ठेवता येईल. (LPG Cylinder Shortage)
होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना परवानगी...
दरम्यान, इराणचे राजदूत मोहम्मद फ़तेह यांनी सांगितले की भारतीय जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सागरी मार्गातून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन संबंधांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की सुरुवातीला संवादात काही अडचणी होत्या, मात्र आता दोन्ही देश परस्पर सहकार्य करत आहेत. (LPG Cylinder Shortage)
एलपीजी जहाजे भारताकडे रवाना...
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अधिकारी राजेश कुमार सिन्हा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ‘शिवालिक’ आणि ‘नंदा’ ही दोन एलपीजी वाहक जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाली आहेत. (LPG Cylinder Shortage)
ही जहाजे सुमारे ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारताकडे येत असून १६ आणि १७ मार्च रोजी मुंद्रा बंदर आणि कांडला बंदर येथे पोहोचण्याची शक्यता आहे. (LPG Cylinder Shortage)