
‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमा प्रकाशित झाला. यावर केरळच्या कम्युनिस्टांनी गदारोळ काय केला, आक्षेप काय घेतला की, केरळमध्ये हे असे होत नाही. केरळला बदनाम केले जाते. पण, त्याच केरळमध्ये हिंदू मोनालिसा हिने तिच्या कुटुंबाच्या विरोधात जात फरमान खानशी हिंदू मंदिरात विवाह केला. यावर कम्युनिस्ट नेते म्हणाले, “हा राज्याचा गौरवाचा क्षण आहे. केरळ, ‘लव्ह जिहाद’ आणि कम्युनिस्ट या सगळ्यांचे संबंध काय आहेत? मोनालिसा आणि फरमान यांच्या प्रकरणाने हे संबंध उघड झाले आहेत. या प्रकरणात ‘द केरळ स्टोरी 3’ आहे का, याचा मागोवा घेणारा हा लेख...
हा राज्याचा गौरवाचा क्षण आहे, हीच केरळची खरी ओळख आहे. हा सामाजिक सद्भाव आहे,” असे केरळच्या वी. शिवनकुट्टी यांनी म्हटले. कशासंदर्भात, तर जन्माने हिंदू असलेल्या मोनालिसाने कुटुंबाशी नाते तोडून, सगळ्यांच्या विरोधात जाऊन, फरमान खान याच्याशी केरळच्या तिरुवनंतपुरममधील अरुमनूर मंदिरात लग्न केले म्हणून. लग्नाला शिक्षणमंत्री वी. शिवनकुट्टी, राज्य सचिव एम.वी गोविंदन आणि राज्यसभा खासदार एए रहीम हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) नेते हजर होते. जर हीच मुलगी मुस्लीम आणि मुलगा हिंदू असता, तर केरळ सरकार त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले असते का? त्याला राज्याचा गौरव वगैरे म्हटले असते का? तर, अर्थातच नाही. बरं मोनालिसा म्हणाली, “हा लव्ह जिहाद नाही, मीच फरमानला लग्नाबद्दल विचारले होते. त्याने नकार दिला; पण मी त्याच्याकडून होकार मिळवलाच.” पण, जे सामाजिक कार्यकर्ते ‘लव्ह जिहाद’मध्ये बळी गेलेल्या मुलींना सोडवण्यासाठी रक्त आटवतात, त्यांना मोनालिसाच्या म्हणण्यातले सत्य चांगलेच माहिती आहे. चांगल्या जीवनाचे आमिष किंवा लैंगिक सुखाची चटक लावून किंवा अतिशय पद्धतशीरपणे ब्लॅकमेल करून, मुलींच्या मनावर ताबा मिळवला जातो. इतका की, त्या मुलीला वाटते, याच्याशिवाय या जगात दुसरे कोणीच माझे नाही. हाच काय तो माझा तारणहार असून, हा काही केल्या माझ्यापासून दूर जाता कामा नये. त्यामुळे मुलगी तिला जाळ्यात अडकवणाऱ्या पुरुषाचे सत्य माहिती असूनही, त्याला वाचवण्याचे प्रयत्न करते. ‘मीच स्वतःहून पळून आले. हा नकोच म्हणत होता, माझे घरचे वाईट आहेत,’ असा खोटा आरोपही या मुली करतात. हेतू हाच की, त्या पुरुषाने लावलेली चटक, दिलेले आमिष मिळावे किंवा त्याच्यापासून असलेला धोका टळावा म्हणून.
या प्रकरणात गेल्या दीड वर्षापासून फरमान आणि मोनालिसा समाज माध्यमांद्वारे संपर्कात असल्याचे समजते. म्हणजे तेव्हा मोनालिसा साडेसोळा वर्षांची अर्थात अल्पवयीन असणार; तर फरमान 25 वर्षांचा. गरीब घरची आणि अचानक कुंभमेळ्यात मणी विकताना प्रसिद्ध झालेली मोनालिसा कोण आहे, हे काय फरमानला माहिती नसेल? आपण एका अल्पवयीन मुलीशी चॅटिंग करत आहे. यावर तिच्या पित्याने म्हटले आहे की, “मोनालिसाला फसवले आहे. तिला सांगितले गेले की, तुला केरळमध्ये मोठमोठ्या सिनेमात रोल देतो आणि तिथे गेल्यावर तिला जाळ्यात ओढले.” असो, मोनालिसा जेव्हा फरमानच्या संपर्कात आली, त्यावेळी ती सनोज मिश्राच्या चित्रपटात काम करत होती. त्याच्यावर नंतर मोनालिसाने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचच मोनालिसाला केरळमध्ये सिनेमात काम करण्याची संधीही मिळाली. ही संधी का आणि कशी मिळाली?
अचानक मोनालिसा आणि तो केरळमध्ये एका सिनेमात एकत्र काम करू लागले. हा काय योगायोग आहे का? हिंदूंमध्ये ‘लव्ह जिहाद’बद्दल प्रचंड आकस असताना मुस्लीम मुले चांगलीच असतात, हिंदू मुलीच त्यांना भरीस पाडतात, हे सिद्ध व्हावे म्हणून मोनालिसा आणि फरमान यांचा विवाह घडवण्यासाठी कितीतरी पात्र पडद्याआड काम करत असणार, हे नक्की. या दोघांचा विवाह म्हणजे एक ‘फेक नॅरेटिव्ह’ जनमानसामध्ये रुजण्यासाठीचा प्रयत्न आहे का? हिंदू पालक मुलींचे लग्न ठरवतील; पण त्यांना न जुमानताच मुस्लीम मुलाशी विवाह केला, तर सरकार दरबारातली मोठी-मोठी माणसे आपली बाजू घेतील, देशभरात प्रसिद्धी मिळेल, हिंदू मुलीने मुस्लीम पुरुषाशी विवाह केला, तर ते चांगले आहे. मुलीला तिचा धर्म सोडावा लागत नाही, असेच हिंदू मुलींना वाटावे, यासाठीच हा लग्नाचा घाट हिंदुद्वेष्ट्यांनी घडवून आणला असेल, असे वाटते.
जसे फरमान म्हणाला की, “मोनालिसाचा धर्म बदलला नाही, तर त्याने ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’द्वारे लग्न केले.” मोनालिसाही म्हणाली की, “ती सगळ्या धर्माला समान मानते.” पण, हे दोघे सगळ्या धर्माला समान मानतात, तर मग त्यांनी देवळात लग्न न करता, मुस्लीम पद्धतीने ‘निकाह’ का केला नाही? कारण तसे करण्यासाठी, मोनालिसाला उघडपणे धर्मांतरण करावे लागले असते. पण, तिने आताच धर्मांतरण केले असते, तर ‘लव्ह जिहाद’ असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असते. हे फरमान आणि त्याला साथ देणाऱ्या केरळच्या कम्युनिस्टांना, चांगलेच माहिती आहे. या गदारोळात फरमानचा बाप जाफर अली म्हणाला, “उद्या फरमानला पोरे झाली, तर त्यांची ओळख काय सांगायची? कारण मोनालिसाने धर्मांतरण केले नाही, तर मुस्लीम समाज तिच्या मुलांना मुस्लीम मानणार नाही.” पुढे मोनालिसाचे काय होईल? तिचे संस्कार, संस्कृती वगैरे सगळे कालांतराने मुस्लीम पद्धतीचे होईलच, यात काहीही संशय नाही. पण, कागदोपत्री ती हिंदू जरी राहिली, तरी तिला पुढे-मागे जी अपत्ये होतील, त्यांचा धर्म काय असेल? आमिर खान, शाहरूख खान आणि सैफ अली खान ते नसरूद्दीन शहा यांनी, हिंदू अभिनेत्रींशी विवाह केला. त्या अभिनेत्रींनी धर्मांतरण केले नाही मात्र, त्यांची मुले तर धर्माने, संस्काराने आणि कर्माने मुस्लीमच झाली. त्यामुळे फरमान आणि मोनालिसा यांच्या मुलांची ओळख काय असेल? याचे उत्तर उघडच आहे. काय करावे आणि काय म्हणावे?
दररोज अनेक मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी होऊन मरतात. कोणी फ्रिजमध्ये, कुणी सुटकेसमध्ये सापडतात; तर कुणी आत्महत्या करतात. हे सगळे पाहून वाटते की, कधीपर्यंत समाजाने ‘द केरळ स्टोरी’ प्रकरणे पाहायची? खरेतर, मोनालिसासारख्या मुलींवर लिहावेसेही वाटत नाही. पण, ‘म्हातारी मेली याचे दुःख नाही, तर काळ सोकावतो आहे’. या अशा घटनांमुळे हिंदूंच्या मुली वापरण्यासाठीच असतात, या विकृत मानसिकतेला आणि हिंदू समाजाला अपमानित करणाऱ्यांना बळ मिळते. त्यामुळे संघटित होऊन समाजाने ‘लव्ह जिहाद’विरोधात उभे राहायलाच हवे.
निचतेची पातळी...
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या फरमानने विवाहासाठी केरळच का गाठले? तसेच थातूरमातूर सिनेमात चिल्लर, नगण्य भूमिका करणाऱ्या फरमानच्या लग्नाची व्यवस्था, केरळमध्ये कशी काय झाली असेल? त्याच्या लग्नाला केरळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मोठेमोठे मंत्री कसे काय उपस्थित झाले? कम्युनिस्ट पक्षाच्या कारकिर्दीमध्ये, देवभूमी केरळ ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’मध्ये बदनाम झाली आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांचा जावईही मुस्लीमच आहे. केरळचे मुख्यमंत्री हे मुस्लीम जावयाच्या मर्जीनुसारच राज्यकारभार चालवतात, हे लपलेले नाही. त्यामुळे केरळच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी काय करावे? कुणाचे समर्थन करावे? यामध्ये कुणाची मर्जी चालेल, हे काय सांगायला हवे. म्हणूनच मोनालिसा आणि फरमानला केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांकडून समर्थन मिळणे, यात नवीन काहीच नाही. तसेच केरळच्या कट्टरपंथी दहशतवादी संघटना ‘लव्ह जिहाद’ घडवण्यासाठी उघडपणे काम करतात. मात्र, तिथल्या अनेक मुस्लिमांना वाटते की, या संघटना ‘अल्ला’चे राज्य आणि ‘शरिया’ कायदा आणण्यात मदत करतील. या कट्टरपंथी संघटनांबद्दल अनेकांना आत्मीयता आहे. त्यामुळेच मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी, कम्युनिस्ट सरकार फरमानच्या पाठी उभे राहिले. सत्तेसाठी अतिशय खालची पातळी गाठली या कम्युनिस्टांनी!