K Annamalai fuel statement: इंधनबाबतच्या भीतीला विरोधकांचे खोटे आरोपच जबाबदार!
15-Mar-2026
Total Views |
मुंबई: (K Annamalai fuel statement) इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशामध्ये इंधन पुरवठ्यावरून राजकारण सुरु झाले असून, विरोधक खोटे आरोप करुन जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलई यांनी केला आहे. देशाचा 70 टक्के इंधन पुरवठा सुरक्षित असून, द्रमुकसारखे विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (K Annamalai fuel statement)
सध्या इराण युद्धामुळे देशातील विरोधकांना मोदी सरकारविरोधात इंधनाचे शस्त्र मिळाले असून, विरोधकांकडून अनेक आरोप इंधनावरून मोदी सरकारवर केले जात आहेत. यामध्ये अनेक प्रादेशिक विरोधी पक्षही सहभागी असून, तामिळनाडूतील सत्ताधारी एम के स्टॅलिन यांचा पक्षही यामध्ये अग्रेसर आहे. द्रमुकने देखील मोदी सरकारच्या इंधनाबाबतच्या धोरणांवर टीका करताना, मोदी सरकार इंधन धोरण राबवण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले होते. यावर टीका करताना तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलई यांनी द्रमुकवर टीका करताना, विरोधत जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण नगरिकामध्ये निर्माण करत असल्याची टीका केली आहे. (K Annamalai fuel statement)
द्रमुकच्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील रालोआ सरकारने इंधनाच्या पुरवठ्यासाठी विविध देशांशी करार केल्याने, देशाच्या पुरवठ्यामध्ये विविधता आल्याचेही अण्णामलई यांनी म्हटले आहे. तसेच, देशामध्ये आयात होणारा 70 टक्के इंधनाचा पुरवठा 70 टक्के सुरळीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशाच्या इंधन पुरवठादारांमध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात वैविध्य आणल्याचा लाभ देशाला मिळत असल्याचेही अण्णामलई यांनी अधोरेखित केले. (K Annamalai fuel statement)
त्याचवेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका करताना, लोक्सभेचे विरोधी पक्ष नेता या न्यायाने राहुल गांधी यांनी संवेदनशील परिस्थितीमध्ये जबाबदारीने वागणे अपेक्षित होते अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी त्यांच्या विशेषाधिकाराचा गैरवापर करत असून, इंधनाबाबत त्यांची विधाने निंदनीय असल्याचेही अण्णामलई यांनी म्हटले. तसेच, काँग्रेस पक्ष तमिळनाडूमध्ये नागरिकांना गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी भडकावत असल्याचाही आरोप केला. (K Annamalai fuel statement)
दरम्यान, इंधन भरलेली भारताची दोन जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाल्याचेही अण्णामलई यांनी स्पष्ट केले. केंद्रातील मोदी सरकार इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धानंतरही भारतात पेट्रोलच्या किमती स्थिर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. (K Annamalai fuel statement)
विरोधकांच्या खोट्या आरोपांमुळे गॅसच्या नोंदणीमध्ये अनैसर्गिक वाढ
इराण- इस्रायल युद्धकाळात देशातील विरोधकांनी इंधन पुरवठ्याविषयी केलेल्या बेजबाबदार आरोपांमुळे नगरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम गॅस नोंदणीवर दिसून आला. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशामध्ये एका दिवसात सामान्यत: 55 लाख सिलेंडरची नोंदणी होते. मात्र, भीतीपोटी अतिरिक्त सिलेंडर नोंदणी केल्याने नोंदणीची संख्या आता 88 लाख झाली आहे. दोन दिवसापूर्वी ही संख्या 78 लाखांपर्यंत वाढली होती. अशा अनैसर्गिक नोंदणीमुळे पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन, देशात कृत्रिम टंचाईचे चित्र निर्माण होत आहे. (K Annamalai fuel statement)