Agri Stack: शेती क्षेत्राकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पाहण्याची वेळ आली आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    15-Mar-2026
Total Views |
 
Agri Stack
 
मुंबई: (Agri Stack) "शेती क्षेत्राकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत गुंतवणूक केल्यास शेतकरी संकटाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकेल.'ॲग्री स्टॅक' तयार करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम असून १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांचा डेटा डिजिटल करण्यात आला आहे. एआयच्या वापरामुळे शेतीचा खर्च २५ टक्क्यांनी कमी होईल आणि उत्पादकता दुप्पट होईल. मागेल त्याला 'शेततळे' आणि सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य बनले असून, जगातली सर्वात मोठी डिस्ट्रिब्युटेड सोलर योजना राबवण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे."असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि.१५ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी केले. (Agri Stack)
 
हेही वाचा: Pune Metro Bhavan inauguration: पुणे मेट्रो मुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस चालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
 
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित ३९ व्या पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते. (Agri Stack)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबवलेल्या 'जलयुक्त शिवार' योजनेमुळे भूजल पातळीत झालेली वाढ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेली जलसुरक्षा याबाबत माहिती दिली गेली. (Agri Stack)
 
शेतीसमोर असलेल्या हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि 'महा-विस्तार' ॲपचे महत्त्व अधोरेखित केले. नवीन कृषी स्नातकांना मातीशी नाते जोडून विज्ञानाच्या मदतीने शेतीचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आवाहन त्यांनी केले. (Agri Stack)