Devendra Fadnavis Baramati bypoll: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

15 Mar 2026 18:09:32
 
Devendra Fadnavis Baramati bypoll
 
मुंबई : (Devendra Fadnavis Baramati bypoll) राहुरी अहिल्यानगर येथे रविवार दि.१५ रोजी पत्रकारांनी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे मत व्यक्त केले की ,"मला असं वाटतं की बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात. एकमताने सर्वांनी मिळून हा निर्णय करावा असा अम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लागली गेली तर ती निवडणूक लढवण्यास आम्ही तयार आहोत. मुंबईच्या महापौर यांच्या गाडीवर लाल दिवा नव्हता तर बोनेटवर तो दिवा होता. यात महापौर यांचा काहीही दोष नाही आहे. राज्यात कुणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला नियम आहे. महापौरांना पण त्याची कल्पना आहे. विनाकारण महापौरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही." (Devendra Fadnavis Baramati bypoll)
 
"नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे. काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक नागरिकांच्या घबराट निर्माण करत आहेत. त्यामुळे पेनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना निर्माण होते. अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात निर्माण केली तर लोक साठवणूक करतील. नागरिकांनी मनातील भीती काढून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा."असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गॅस सिलिंडर तुटवड्याच्या अफवांबाबत म्हणाले. (Devendra Fadnavis Baramati bypoll)
 
 
Powered By Sangraha 9.0