पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ कार्यक्रमास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती

14 Mar 2026 17:35:58
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : (Mangal Prabhat Lodha) देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत माधवबाग येथे उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
 
"यावेळी केंद्र तसेच राज्य सरकारने राबवलेल्या विविध लोकाभिमुख योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर भाजपाची विचारधारा आणि धोरणे जनमाणसात अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कार्यरत राहण्याचा यावेळी संकल्प केला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला."अशी प्रतिक्रिया मंत्री लोढा यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0